Home बुलडाणा अल्पवयीन बालिकेवर चार तरुणांचा सामूहिक बलात्कार

अल्पवयीन बालिकेवर चार तरुणांचा सामूहिक बलात्कार

643
0

,

खळबळजनक घटना ,

अमीन शाह ,

बुलडाणा ,

तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड खुर्द येथे 18 सप्टेंबरला रात्री घडली . जळगाव जामोद पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आज , 19 सप्टेंबरला पहाटे साडेपाचलाच तीन तरुणांना अटक केली आहे . एक जण फरारी असून , त्याचा शोध घेतला जात आहे . पोलीस सूत्रांनी सांगितले , की मडाखेड खुर्द येथील 15 वर्षीय मुलगी शौचासाठी काल रात्री आठच्या सुमारास गावाबाहेर गेली होती . तिच्यावर पाळत ठेवून सागर मांडोकर , टिल्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे ( 22 ) , संदीप वसंत जवंजाळ ( 27 ) , ज्ञानेश्वर प्रभाकर शित्रे ( 35 , सर्व रा . मडाखेड खुर्द ) या चौघांनी तिला गाठले . ज्ञानेश्वरने तिच्या तोंडावर कापड टाकून तोंड दाबले . चौघांनी मिळून तिला मरीमातेच्या मंदिराकडे ओढत नेले . तेथे तिला झोपवून ज्ञानेश्वरने सागर , टिल्या यांना तुम्ही काय करायचे ते करा , मी तिचे तोंड दाबले आहे असे म्हणून तोंड दाबून धरले . टिल्याने तिचे हात पकडले . सागरने तिच्यावर बलात्कार केला . त्यानंतर सागरने हात पकडून टिल्याने बलात्कार केला . संदीप जवंजाळ याने कोणी येत तर नाही ना , याकडे लक्ष ठेवले . बलात्कार केल्यानंतर ज्ञानेश्वरने तिला तू जर घरच्यांना सांगितले तर तुला मारू , अशी धमकी दिली व तेथून पळून गेले . मुलीने घरी येताच टाहो फोडल्याने घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला . त्यावरून तिच्या चुलत भावासह जळगाव जामोद पोलीस ठाण्यात येत तिने तक्रार दाखल केली . त्यावरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . टिल्या , संदीप , ज्ञानेश्वरला आज पहाटेच त्यांच्या घरातून अटक केली . सागर फरारी असून , त्याचा शोध घेतला जात आहे . तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वळवी , पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड , पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील , हे करीत आहे ,