महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदावर प्रा शिवाजी काटे यांची निवड

Advertisements

 

निजाम पटेल ,

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी ,

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकरणीस प्रांताध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात साहेब , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी मान्यता दिली . अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदी शेवगाव येथील प्रा. शिवाजीराव काटे पाटील यांची निवड झाली. मा नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे प्रा काटे यांनी यावेळी बोलताना सांगितले . तसेच , स्वातंत्र्यपूर्व
काळात व स्वातंत्र्यानंतरच्या काळात पण
प्रत्येक क्षेत्रातील सर्वसामान्य व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून कार्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विचारांचे काम करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले . त्यावेळी त्यांचे अभिनंदन शेवगाव तालुका काँग्रेस चे अध्यक्ष मा. अमोल फडके यांनी केले , त्यावेळी अल्पसंख्याक सेल चे अध्यक्ष बब्बूभाई शेख ,सचिव शोएब पठाण,उपाध्यक्ष किशोर कापरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा शिवाजी काटे यांच्या निवडीबद्दल माजी प्राचार्य मोहनराव शेटे सर, सा खरा महाराष्ट्राचे मुख्य संपादक निजाम पटेल, कार्यकारी संपादक चंद्रशेखर शेटे पाटील यांच्यासह परिसरातील मित्र परिवार व हितचिंतक यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

You may also like

महाराष्ट्र

आ. पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मेंढपाळाणा मास्क वाटप

लोकनेते, विधानपरिषद सदस्य आ.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने मंगळवारी मेंढपाळांना मास्क वाटप ...
महाराष्ट्र

जीवन गौरवचा अनोखा ऑनलाईन मुख्याध्यापक,शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न…!

ठाणे – प्रतिनिधी जीवन गौरव सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा क्षेत्राला वाहिलेले मासिक मार्फत आयोजित ऑनलाईन ...
महाराष्ट्र

शहरी व ग्रामीण पत्रकारांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा – विनोद पञे

पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रात कोरोना काळात आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांना 50 लाखाच्या विमाकवच ...