
पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!
घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे
कुंभार पिंपळगाव व परिसरातील सर्व सकल मराठा समाजबांधवांना आवाहन करण्यात येते की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण स्थगिती ला 8 दिवस होत नाहीत, तोच राज्य सरकारने 12 हजार 897 पदासाठीची पोलीस मेगाभरतीची घोषणा करून मराठा समाजाच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळले आहे.
मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला नोकरीपासून वंचीत ठेवण्याचा हा एक प्रकार घाट रचला गेला आहे अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.मराठा समाजातील तरुणाच्या मनात तीव्र अस्वस्थता व रोष व्यक्त होत आहे .
याच पार्श्वभूमीवर सदरील नोकर भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी किंवा 16% आरक्षीत जागा राखीव रिक्त ठेऊन उर्वरीत जागांसाठी भरती करावी किंवा सदरील भरती प्रक्रिया काही काळ पुढे ढकलण्यात यावी .
सारथी संस्था बळकट करण्यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ची व्याप्ती वाढून विस्तार करावा , घटनापीठाचा निर्णय येइपर्यंत आरक्षण चा लाभ मिळावा या व इतर मागण्यांसाठी सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय सर्कल सकल मराठा कुंभार पिंपळगावच्या वतीने १८सप्टेंबर शुक्रवारी रोजी सायंकाळी रविराज फर्निचर , इलेक्ट्रॉनिक या दुकानासमोर चिंतन बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते.या बैठकीमध्ये पुढील वाटचाल व दिशा ठरवण्यासाठी तसेच जालना मराठा क्रांती मोर्चा संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.











































