Home मराठवाडा डॉ योगेश अडबलवाड सरसमकर यांचे MS ऑर्थोपॅडीक पदव्युत्तर परीक्षेत यश..

डॉ योगेश अडबलवाड सरसमकर यांचे MS ऑर्थोपॅडीक पदव्युत्तर परीक्षेत यश..

288
0

नांदेड , (बालाजी सिलमवार) – हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील श्री माधवराव अडबलवाड कक्ष अधिकारी पं. स. पूर्णा जेष्ठ चिरंजीव चि. योगेश हे एमबीबीएस शिक्षणानंतर नंतर सायन मेडिकल कॉलेज ( लोकमान्य टिळक ) मुंबई येथून MS ऑर्थोपॅडीक पदव्युत्तर पदवी घेऊन आज उत्तीर्ण झाले आहेत. डॉ. योगेश कुमार हे सामाजिक कार्याचा / सेवेचा वडिलोपार्जित वसा घेऊन ते वैद्यकीय सेवेत रुजू होत आहेत. सध्याच्या कोरोना महामारीत सायन रुग्णालयात “रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग… “या भावनेने वैद्यकीय सेवा डॉ योगेश ने दिलेली आहे… अशीच सेवाभावी वृत्ति ठेऊन रुग्णसेवा पर्यायाने समाजसेवा,देशसेवा डॉ योगेशच्या हातून घडावी…त्यासाठी आम्हा समस्त पालकवर्ग व समाज बांधवांकडून भावी जीवनासाठी खूप सदिच्छा…..

वैद्यकीय क्षेत्रातील सेवेसाठी व भावी जीवनासाठी योगेश माधवराव अडबल वाड यांना मित्रमंडळी ग्रामस्थ व समाजातील सर्व स्थरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.