Home विदर्भ वाटसरूंनो…सावधान समोर विजेच्या जिवंत तारा पडल्या आहेत.

वाटसरूंनो…सावधान समोर विजेच्या जिवंत तारा पडल्या आहेत.

215

प्राधिकरणाचा हलगर्जीपणा  

वाटसरुंच्या जीवाला धोका

दुरुस्तीची मागणी 

भांब (राजा) मध्ये संताप

देवानंद जाधव

यवतमाळ (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ ते आर्णी मार्गावरील भांब राजा येथील ऊडाण पुलानजीक विजेच्या जिवंत तारा पडल्या आहेत. अलीकडेच महामार्गावर ऊंचच उंच खांबाची ऊभारणी केली आहे. त्यावर मोठया वॅटचे दिवे लावले, ते सुरु पण झाले. माञ संपुर्ण खांबाला विद्युत पुरवठा करणार्या तारा आणि शाॅकेट चक्क ऊघडे ठेवण्यात आले आहे. भांब राजा च्या योगेश्र्वर धाब्यासमोर हा अक्षम्य आणि हलगर्जीपणा समोर आला आहे. या महामार्गावरुन दररोज हजारो वाहनांची आंणि वाटसरुंची ये जा होत असते. त्यामुळे संभाव्य अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाने जनतेच्या जीवाला धोका निर्माण करणार्या विजेच्या जिवंत तारा आणि ऊघडे ठेवलेले शक्तिशाली शाॅकेट तातडीने दुरुस्त करावे. आणि दोषी विद्युत कंञाटदारावर कडक कारवाई करावी असी मागणी तमाम ग्रामस्थांकडुन केली जात आहे. तुर्तास.. वाटसरुंनो…सावधान….
समोर विजेच्या जिवंत तारा पडल्या आहेत. असेच सुचित करणे सध्या तरी संयुक्तिक आणि वाटसरुंच्या हिताचे वाटते. महामार्ग प्राधिकरणाने नवनिर्मित सिमेंट रोडवर वाटसरुंच्या रक्ताच्या अभिषेकाची प्रतिक्षा न करता विना विलंब दुरुस्ती करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.