Home जळगाव महिला अधिकाऱ्यांनी पाठलागाने पकडला वाळूचा अवेंध ट्रक

महिला अधिकाऱ्यांनी पाठलागाने पकडला वाळूचा अवेंध ट्रक

114
0

लियाकत शाह

भुसावळ  – तालुक्यातील सिंधी, खडका आणि सुनसगाव येथील तलाठी महिला अधिकाऱ्यांनी पाठलाग करून वाळूचा ट्रक पकडल्याची घटना गुरुवारी दुपारी नहाटा चौफुली ते गणपती मार्बल दरण्यान घडली. ट्रक मालकास तव्बल अडीच लाखाचा दंड आकारला. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सिंदी तलाठी साधना खुळे, खडका तलाठी मनीषा गायकवाड आणि सुनसगावच्या तलाठी जयश्री पाटील यांचे पथक गस्त घालत नहाटा चौफुलीवर उभे होते. याचवेळी अवैध वाळू नेताना टक (एमएच-१९-जे-०१५०) तेथून जात होता. महिला अधिकाऱ्यांनी ट्रकला थांबण्याची सूचना केली. पण ट्रक थांबला नाही. त्यानंतर तिघांती ट्रकचा पाठलाग करून ट्रकला पकडले.