Home रायगड रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

116

गिरिश भोपी –  रायगड

जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा कार्यभार श्री.जयसिंग दत्तात्रय मेहेत्रे यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांच्याकडून आज सकाळी कार्यालयीन वेळेत स्वीकारला. यापूर्वी जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांची बदली झाल्यामुळे जिल्हा नियोजन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
श्री.सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जयसिंग मेहेत्रे यांचे स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, संशोधन सहाय्यक परिचय देसाई हे उपस्थित होते.