Home बुलडाणा मुलाने जन्मदात्या बापास मारून टाकले ,

मुलाने जन्मदात्या बापास मारून टाकले ,

432

 

गुन्हा दाखल ,

अमीन शाह ,

बुलडाणा ,

दारूसाठी पैसे मागून सतत आईला मारहाण करत असल्याने मुलानेच पित्याची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना पहूर ( ता . लोणार ) येथे 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली . आज , 18 सप्टेंबरला सकाळी पावणेआठच्या सुमारास या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे . रामजी मारोती मारकड ( 55 ) असे हत्या झालेल्या पित्याचे नाव असून , विठ्ठल रामजी मारकड असे आरोपी युवकाचे नाव आहे . रामजी मारकड हे द्वारकाबाई हिला दारू पिऊन मारहाण करून त्रास देत होते . काल सायंकाळीही द्वारकाबाईंना मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याची गहूपोत दारू पिण्यासाठी रामजी घेऊन गेला होता . ही माहिती द्वारकाबाईने विठ्ठलला दिली . त्यामुळे संतप्त झालेल्या विठ्ठलने वडिलांचा शोध घेऊन त्यांना गाठले आणि मारहाण करायला सुरुवात केली . रागाच्या भरातच त्याने वडिलांना पाठीत काठीने बेदम मारहाण केली . गळा दाबून त्यांची हत्या केली . या प्रकरणात विठ्ठलची बहीण गंगासागर कुंडलिक जुमडे ( 30 , जांभरूण , जि . हिंगोली ) हिने लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली . त्यावरून पोलिसांनी विठ्ठलविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे . तपास पोलीस निरिक्षक रवींद्र देशमुख करत आहेत .https://youtu.be/YPfMIKV7Guo