Home जळगाव नरेंद्र मोदी जीं च्या वाढदिवसानिमित्त मनियार बिरादरी तर्फे १८ मागण्याचे निवेदन

नरेंद्र मोदी जीं च्या वाढदिवसानिमित्त मनियार बिरादरी तर्फे १८ मागण्याचे निवेदन

91
0

रावेर (शरीफ शेख) 

 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी चे  तथा प्रदेशाध्यक्ष फारुक शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इ मेल द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा  देताना सबका साथ- सबका विकास -सबका विश्वास यानुसार आपण कार्यरत आहात तर मुस्लिम समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा खालील मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केलेली आहे.

                 मागण्या

१) न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा, डॉक्टर मोहम्मदूर रहमान या समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करणे

२) पंतप्रधानांचा पंधरा कलमी कार्यक्रम ची अमलबजावणी

 ३) भारत सरकार व दिल्ली सरकारने बेकायदेशीर कारवाया नियंत्रण कायदा रद्द करण्यात यावा

४) मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा लागू करावा ५)वक्फ बोर्ड कमिटीच्या जमिनीचा समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा

 ६) एन आर सी, सी ए ए,एन पी आर हा कायदा रद्द करावा

७) मुस्लिम तरुण व काही तरुणी जे निरपराध असून कारागृहामध्ये वर्षानुवर्षे डांबून ठेवलेले आहे त्यांच्या सुटकेसाठी योग्य ती कारवाई करावी

८) दिल्ली येथे दंगलीत ५३ लोक मृत्युमुखी पडले ,१९ मशिदी, ४अरबी मदरसे,दोन दर्गाह तसेच ५०० दुकाने व घरे जळून भस्मसात झाली त्या दिल्ली शहरात  सुमारे २ लाख सीसीटीव्ही कॅमेरे असतानासुद्धा फक्त २३ मुस्लिम अपराधी पकडले गेले त्यांना पूर्वग्रहदूषित भावनेने अटक करण्यात आलेली आहे त्यांची त्वरित सुटका करावी

  ९) दिल्ली दंगलीचे कपिल मिष्रा कोमल शर्मा ज्यांनी दंगलीला चिथावणी दिली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी 

१०)प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण व गुणवत्ता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी

११)मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठान पायाभूत शिक्षण सुविधा देण्यात याव्यात

 १२)मुस्लिम समाजातील गरिबांसाठी स्वयं रोजगार,व  बेरोजगार साठी दैनिक रोजंदारी साठी विशेष अभियान आखून भांडवल व कर्ज पुरवठा करण्यात यावा

१३) शहरी व ग्रामीण रोजगार हमी योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी

१४) तांत्रिक व कौशल्यवृद्धी कार्यक्रमात वाढ करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी

१५) केंद्रीय व राज्य सेवांमध्ये सेवा भरती साठी मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावे

 १६) जातीय वादी घटना, जातीय दंगली, दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही यांच्यासाठी ठोस पावले उचलावी.

१७) मॉब लिंचिंग विराधात कायदा करण्यात यावा

 

 १८) जातीय दंगलीमध्ये जे मृत पावले त्यांचे वारस तसेच जे निरपराध कारागृहांमध्ये पाच ते दहा वर्षे राहून निर्दोष सुटून आले व येत आहे त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे 

अशा स्वरूपाच्या १८ मागण्या फारुक शेख यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या आहेत.