Home मराठवाडा मोकाट जनावरांचा खांड बनलाय शेतकऱ्यांची डोकेदुखी…

मोकाट जनावरांचा खांड बनलाय शेतकऱ्यांची डोकेदुखी…

183
0

मोठया प्रमाणात पिकांची नासाडी तर शेतकऱ्यांची बंदोबस्त करण्याची मागणी…!

जालना – लक्ष्मण बिलोरे

– गावात आणि शेतशिवारात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला असून यामुळे गावकरी वैतागले आहेत तर शेतातील पिकाची नासाडी होत असल्याने, शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. बदनापुर तालुक्यातील पाडळी गाव लगत असलेल्या शेतातील पिकं,हि मोकाट जनावरे खुंदळून काढत आहेत.
आधीच अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हैराण आहेत.खरिपाची पिके पिवळी पडू लागली आहेत.मुगाचे पिक हातचे गेले.तूर, कपाशीने पाणी धरले आहे आणि त्यात उरले सुरले पीक मोकाट जनावरे फस्त करत आहेत. त्रास उगाच सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना खडा पहारा द्यावा लागत आहे. या शेतातून त्या शेतात मोकाट जनावरांचे जत्थे फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आपसात संभ्रम निर्माण होऊन एकमेका विरुद्ध वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला गेला पाहिजे.या समस्येकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे. पाडळी ग्रामपंचायतला या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा याबाबत खबर देण्यात आलेली आहे.वेळीच दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी शेतकऱयांची मागणी आहे.

हे पण वाचा….!

पाडळीचे सरपंच अविनाश शेळके म्हणतात….
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत तयार आहे. परंतु गावकऱ्यांचीही काही जबाबदारी आहे, सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तरच शक्य आहे, या पूर्वी ग्रामपंचायतने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु काही लोकाचा विरोध असल्याने बंदोबस्त करण्यास अयशस्वी ठरलो होतो. शेतकऱ्यांच पिकाच नुकसान होत असेल तर नक्कीच ग्रामपंचायत कडूनसहकार्य मिळेल त्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्यची गरज आहे.

कृषी अधिकारी काय म्हणतात ?

– मोकाट जनावरांना ग्रामपंचायतीने कोंडवाड्यात टाकावे. दूर तलावाच्या ठिकाणीही पाठवता येवू शकते, किंवा गोशाळेत पाठवावे
हे प्रकरण गावपातळीवर सोडवण्यात आले पाहिजे… तालुका कृषी अधिकारी
एम. ठक्के बदनापूर