Home महत्वाची बातमी पालिका एल विभागातील कोणतेही परवाना नसलेली बेकायदेशीरपणे सुरू असलेले सीख कबाब पराठा...

पालिका एल विभागातील कोणतेही परवाना नसलेली बेकायदेशीरपणे सुरू असलेले सीख कबाब पराठा व हॉटेलवर कारवाई कधी करणार?

37
0

पालिका आयुक्त पुन्हा भयंकर अग्नितांडवात निष्पाप नागरिकांची जीवितहानी व वित्तीयहानी होण्याची वाट पाहणार आहात काय ?

कुर्ला , दि. १० :- ( प्रतिनिधी ) कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेलमध्ये पाच वर्षांपूर्वी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सुद्धा पालिका एल विभागाचे भ्रष्ट अधिकारी अजून अग्नितांडव होऊन त्यात निष्पाप नागरिकांचे बळी पडण्यासाठी वाट पहात होते.

भ्रष्ट पालिका अधिकारी यांची लाचखोरी व कर्तव्यात कसुरपणा व हलगर्जीपणामुळेच पुन्हा साकीनाका भागातील खैरानी रोडलगतच्या परिसरात दिनांक २७/१२/२०१९ रोजी शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत निष्पाप दोघांचा मृत्यू झाला असून एक जण अजूनही काहीजण बेपत्ता आहेत त्यांचा शोध युद्ध पातळीवर घेतला जात आहे.पालिका एल विभागाचे अग्निशमन दल ,जलअभियंता विभाग,परवाना विभाग,आरोग्य विभाग,पोलीस तसेच इमारत आणि कारखाना विभाग यंत्रणा विभागाने जाणूनबुजून हेतुपुरस्सरपणे डोळेझाक करीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आस्थापणाकडून आपले उखळ पांढरे करीत खोटा अहवाल सादर करीत पालिका आयुक्तांच्या डोळ्यात धूळफेक करून त्यांची घोरफसवणुक वेळोवेळी करण्यात येत आहे.

सूत्रानुसार असे कळते की,पालिका कुर्ला /पश्चिम परिसरातील येथील मुख्य रस्त्यावरील लोखंडी पत्र्यांचे आणि आरसीसीचे पक्के बांधकामांचे तळमजला+ पहिला मजला+दुसरा मजला असे रचनेचे झोपडीवजा इमारतीं मधील सीख कबाब पराठा व हॉटेल यांच्या जवळ कोणतेही परवाना नसताना पालिका प्रशासन,अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांच्या कृपादृष्टीने बेकायदेशीरपणे गेली काही वर्षांपासुन खुले आमपणे सीख कबाब सीख पराठा कॉर्नर,हॉटेल सकाळ पासून थेट रात्री ०३ वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुले ठेवलेले असतात.पालिका एल विभागातील कुर्ला / पश्चिम परिसरातील सीख पराठा कॉर्नर,हॉटेल, दुकाने,गोदामे आस्थापनास स्थानिक नगरसेवकाच्या कृपादृष्टीने व पालिका विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या मदत , प्रोत्साहन, मार्गदर्शन तसेच संरक्षणाखाली सुरू असून त्याबदल्यात परवाना नसलेली कबाब सीख पराठा आस्थापनाकडून आर्थिकदृष्ट्या फायदा घेण्यात येत आहे.

प्राप्त माहितीच्या आधारे असे कळते की,फूड अँड ड्रग्स कँझुमर वेल्फेअर कमिटी , नवं संजीवन फाउंडेशन ट्रस्ट,माहिती सेवा समिती,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती आणि पसार माध्यमांतील काही संपादक प्रतिनिधींनी कुर्ला/पश्चिम येथील अवैधरित्या सुरू असलेल्या सीख कबाब पराठा हॉटेल प्रकरणी राज्यशासन ते महानगरपालिका प्रशासन यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत पण पालिका एल विभागाचे संबंधीत प्रशासनाचे खाते प्रमुख अनधिकृतपणे व कोणताही परवाना नसलेले सीख कबाब पराठा कॉर्नर आस्थापणाचे मालक,चालक यांच्या आर्थिकदृष्ट्या दावणीला बांधलेले असल्यामुळे पालिका प्रशासन भ्रष्टाचारापुढे हतबल झालेली आहे.तर पालिका संबंधित खातेचे प्रमुख पितळ उघडकीस येऊ नये म्हणून फक्त कागदीघोडे नाचवित थातुरमातुर कागदोपत्री कारवाई दाखल करीत असून पुन्हा जैसे थे!प्रमाणे सर्व काही अलबेल असते. कबाब सीख पराठा हॉटेल आस्थापनाचे मालक तोच – तोच गुन्हा सातत्याने करीत संबंधित तक्रारदारांच्या तक्रारींस केराची टोपली दाखवण्यात पालिका भ्रष्ट अधिकारी अग्रेसर आहेत. दुसरे महत्वाचे पालिका अग्निशमन दल विभागाचे संबंधीत अधिकारी नाममात्र असून त्याने प्रत्यक्षात वर्षभरात महाराष्ट्र आग प्रतिबंध -जीवसुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ , नियम २००९ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वरील नमूद पेढीवर कलम ८(२)नुसार वीजपुरवठा आणि पाणी नळ जोडणी खंडीत करून कलम ३६ नुसार शिक्षेचे प्रत्यक्षात कृती केलीच नाही. काही दिवसांपूर्वी येथील सीख पराठा कॉर्नर लोखंडी पत्र्याच्या एकमजली झोपडीत सुरू असताना रात्रीच्या वेळी सिलिंडर गैस स्टोव्हचा भडका उडून ग्राहकांना आगीच्या ज्वाळाने पकडले सुद्धा होते. त्यावेळी वेळीच तेथील ग्राहकांना सुरक्षित ठिकाणी हलविल्याने आगीत ग्राहकाचा हाताला किरकोळ भाजले त्यास तात्काळ उपचार करून सदरचे प्रकरण दाबण्यात आलेले आहे. तर दुसरी घटना अशी की, लोखंडी पत्र्याचे हॉटेल मध्ये स्टोव्हच्या उष्णतेमुळे लाईट शॉर्ट सर्किट झाल्याने ग्राहकांना करंट लागला होता. तेव्हा काहीजणांनी विद्युत पुरवठा खंडीत करून पीडिताला वाचविण्यात येऊन त्यांची मुस्कटदाबी केली आहे.या आस्थापना मध्ये दुर्देवाने अघटित घडले असते तर साकीनाका येथील अग्नितांडवापेक्षा भयंकर जीवितहानी व वित्तीयहानी झाली असते.

दिनांक २७/१२/२०१९ रोजी साकीनाका भागातील खैरानी रोडवरील आगीची खबर येण्याच्या आधीच सीख पराठा कॉर्नर हॉटेल मध्ये दुर्दैवी घटना उघडकीस आली असती.साकीनाका भागातील खैरानी रोडलगतच्या अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला जाग आली असून अग्निशमन दल ,जलअभियंता विभाग,परवाना विभाग,आरोग्य विभाग,पोलीस तसेच इमारत आणि कारखाना विभागाच्या माध्यमातून संयुक्तपणे कुर्ला-साकीनाका रोड,खैरानी रोड, जरीमरी रोड आदीं मार्गावरील गाळ्यांसह हॉटेलां विरोधात पुन्हा संयुक्त मोहीम दिनांक ३०/१२/२०१९ रोजी हाती घेतली आहे, परंतु अनधिकृतपणे कोणताही परवाना नसलेले सीख कबाब पराठा व हॉटेल वर आजपर्यंत कोणत्याही स्वरूपाची कारवाई महापालिका एल विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज यांच्याद्वारे होत नसल्याचे दिसून येत आहे.परिणामी पालिका आयुक्त कोणतेही परवाना नसलेले सीख कबाब कॉर्नर तथा सीख पराठा हॉटेल मधील निष्काजीपणामुळे पुन्हा भयंकर अग्नितांडवात निष्पाप नागरिकांची जीवितहानी व वित्तीयहानी होण्याची वाट पाहणार आहात काय ?

असा प्रश्न सामाजिक संस्थेने , दक्ष नागरिक ,पत्रकारांनी आयुक्तांना दिलेल्या सविनय निवेदनात केलेला आहे.

Unlimited Reseller Hosting