Home विदर्भ बँकांनी विश्वासाने महिला बचत गटाना कर्ज वाटप करावे – जिल्हाधिकारी विवेक भिमनवार

बँकांनी विश्वासाने महिला बचत गटाना कर्ज वाटप करावे – जिल्हाधिकारी विवेक भिमनवार

33
0

सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १० :- बचत गटाच्या महिलांना कर्ज वाटप सर्वात सुर‍क्षित आहे. आतापर्यंत या महिलांनी एकही कर्ज बुडविलेले नाही. बँकांनीही कर्ज वाटप करतांना त्रुटी काढून अडवण्यापेक्षा विश्वासानने कर्ज द्यावे कारण कर्ज घेउुन ते परत न करणे हे आमच्या भगिनींच्या संस्कारात नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी व-हाड महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

महाराष्ट्र राज्यग्रामीण जीवनोन्नती अभियान,उमेद ग्रामीण विकास विभागाच्या विभागीय कार्यालय व ग्रामीण विकास यंत्रणाच्या वतीने लोक महाविद्यालयाचे प्रांगणात स्वयंसहाय्यता गटाव्दारे निर्मित वस्तुचे वर्धा वर्धिनी पुरुस्कृत व-हाड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाच्या उदघाटन ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्षा वैशाली येरावार,उमेदचे प्रकल्प उपायुक्त रविद्र शिंदे, जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली, प्रकल्प संचालक सत्यजित बढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, नागपूरचे प्रकल्प संचालक विवेक इलमे, सुनिल निकम, जिल्हा परिषदेचे विषय समितीचे सभापती, पंचायत समितीचे सभापती उपस्थित होते.

या महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांना वस्तू विक्रीसाठी व्यासपीठ मिळाले आहे. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेलया वस्तू महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत या वस्तूच्या विक्रिमुळे बचत सक्षम करण्यासाठी महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढून महिला सक्षम होईल. जिल्हयातील बचत गटांनी केलेल्या उत्पादनाची ओळख देशपातळीवर होत असल्यामुळे आज वर्धा जिल्याचे नाव देशात नावलौकिक होत आहे. बचत गटातील महिलांनी आपले कौशल्य कुटूंबा सोबतच समाजापुढे आणने गरजेचे आहे. असे श्री. भिमनवार म्हणाले.

महिलांनी वेळोवेळी आपण सक्षम असलयाचे दाखवून दिले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना आकर्षक पॅकिंग नसते मात्र ते नक्कीच भेसळमुक्त असतात. म्हणुन जास्त प्रमाणात बचतगटाच्या उत्पादनांची खरेदी करावी असे आवाहन सरिता गाखरे यांनी केले.

8 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान चालणा- या व-हाड महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विविध बँकेच्या वतीने 2 हजार 390 बचत गटांना 34 कोटी रुपयाचे कर्ज वितरीत करण्यात आले. महोत्सवात आठ जिल्हयातून विविध वस्तू विक्रीच 134 स्टॉल लावण्यात आले आहे. पाच दिवस चालणा-या या महोत्सवात नागरिकांना खाद्य पदार्थाच्या व्यतीरिक्त सांस्कतिक कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला नागरिकांनी भेट देऊन बचत गटानी उत्पादित केलेल्या वस्तूची खरेदी करुन बचत गटातील महिला सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting