Home विदर्भ सेलू येथे रोख रकमेसह एटीएम मशीन केलीअज्ञात चोरट्यांनी लंपास.!

सेलू येथे रोख रकमेसह एटीएम मशीन केलीअज्ञात चोरट्यांनी लंपास.!

103

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १० :- जिल्ह्यातील सेलू येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे ए टी एम अज्ञात चोरट्यानी रोख रकमेसह पळवून नेल्याने चांगलीच खळबळ उडालीआहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले एटीएम चोरट्यांनी लांबविल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. गुरुवार ता.९ जानेवारी चे दुपारी १० लाख ९४ हजार रुपयांची रोख टाकण्यात आली होती. त्यातून किती रकमेची निकासी झाली व किती रोख रक्कम त्या ए टी एम मधे शिल्लक होती हे मात्र कळू शकले नाही. मध्यरात्रीच्या ३ वाजून ०९ मिनिटाला गश्तीवर असलेल्या डी.बी.पोलीस पथकाने मशीन चे फोटो सुध्दा काढले. तेव्हा मशीन असल्याने सदर घटना ही त्यानंतरच घडली असावी. मुख्य रस्त्यावरील संपूर्ण मशीनच पळवून नेल्याने खळबळ माजली आहे.
पोलिसांचा ता. ९ ला वर्धा येथे कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात पोलिस यंत्रणा व्यस्त असल्याचे पाहून चोरट्यांनी हात साफ केला असावा अशीही चर्चा आहे. सेलूत गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहे. पोलिसांची रात्रीची गस्त घालण्याचे प्रमाण कमी झाल्याने या घटना घडत आहे.
जिल्ह्यात एटीएम मशीन फोडण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या १० दिवसांपूर्वी सेवाग्राम येथे एटीएम पळवून नेल्याची घटना घडली होती. आता सेलू मध्ये एटीएम मशीन काढून नेत सेवाग्राम येथील घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एटीएमच्या चोरीची घटना सर्वाना आश्चर्यचकित करणारी आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, गुन्हें अन्वेषण विभागाचे निलेश ब्राम्हणे, मिलिंद रामटेके, इंगळे,पोलीस निरीक्षक आशीष मोरखडे, सेलु पोलीस निरीक्षक सुनील गाढे आदिंनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतू ए टी एम सामोर पाण्याचे डबके साचले असल्याने श्वान त्याचे पुढे जावू शकला नाही.