Home बुलडाणा माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळाटाळ करणे भोवले

माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळाटाळ करणे भोवले

649

 

माहिती देण्यास विलंब केला म्हणून भरावा लागणार दंड.

हनिफ शेख ,

तहसील कार्यालय शेगाव तालुका आणि मेहकर तालुका या कार्यालयातील महसुली वार्षिक लेखा परीक्षण पथकाने केलेल्या लेखापरीक्षण अहवालाची आणि सदर कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या अनुपालन व इतर शासकीय कागदपत्राची 2015 मध्ये माहिती अधिकारात चंद्रकांत खरात यांनी माहिती मागितली होती मात्र सदर जन माहिती अधिकारी यांनी अपीलार्थिस
विलंबाने माहिती दिल्यामुळे शेगाव व मेहकर या दोन्ही तहसील मधील जन् माहितीअधिकाऱ्यांना शास्ती करण्यात आली.
जन माहिती अधिकारी तहसील शेगाव यांनी अपिलार्थिस विलंबाने माहिती देण्यात आल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 7(1) नुसार तत्कालीन जन माहिती अधिकारी एस. झेड. पवार, डी .एल. मुकुंद, व विद्यमान जन माहिती अधिकारी ए. एम. ढवळे, यांनी 30 दिवसाच्या विहित मुदतीत उपलब्ध व देय ठरत असलेल्या माहितीचे
अपीलार्थिस प्रदान केले नाही म्हणून त्यांना कलम 20(1) नुसार आर. एस. झेड पवार, डी. एल. मुकुंद, यांना प्रत्येकी 25000 ( रुपये पंचवीस हजार) एवढी शास्ती करण्यात आली आहे व ए. एम. ढवळे, यांना 250 (रुपये दोनशे पन्नास) दर दिवसा प्रमाणे 80 दिवसाकरीता 20000(वीस हजार रुपये) एवढी शास्ती करण्यात आली आहे तर
जन माहिती अधिकारी मेहकर यांनीअपिलार्थिस
वेळेत माहिती पुरवण्यात आली नाही त्यामुळे माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 7(1) नुसार तत्कालीन जन माहिती अधिकारी श्रीमती एम एस जाधव व विद्यमान जन् माहिती अधिकारी श्रीमती वाय ए परळीकर ज्यांनी 30 दिवसाच्या विहीत मुदतीत उपलब्ध व देय ठरत असलेल्या माहितीचे अपिलार्थीस प्रदान केले नाही म्हणून कलम 20(1) नुसार श्रीमती एम एस जाधव यांना रुपये 25000 (पंचवीस हजार फक्त) एवढी शास्ती करण्यात आली व वाय ए परळीकर यांना रुपये 250 ऊस दर दिवसाप्रमाणे 82 दिवसाकरीता20500 एवढी शास्ति करण्यात आली असे आदेश राज्य माहिती आयुक्त अमरावती खंडपीठ अमरावती यांनी दिले