Home बुलडाणा पाडळी शिंदे येथे वादळी पाऊसाचा तडाखा कपाशी पिकाचे नुकसान

पाडळी शिंदे येथे वादळी पाऊसाचा तडाखा कपाशी पिकाचे नुकसान

222
0

तात्काळ सर्वे करून नुकसान भरपाई देण्यात यावी ,

पाडळी शिंदे(प्रतिनिधी):-९सप्टेंबर बुधवारी रात्री मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे एन भरात असलेले कपाशी पीक याचे नुसकाण झाले असून मंडळात मात्र मोजकाच पाऊस झाल्याने व शेतकरी वर्ग यांना नुसकाणी पासून वंचीत राहावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच सततच्या पावसाने मुंग उडीद ही पिके हातची निघून गेली असून त्याचे पंचनामे करण्यात आले मात्र प्रत्यक्ष्यात नुकसान भरपाई केव्हा मिळणार याकडे शेतकरी वर्ग याचे लक्ष लागले आहे.

सोयाबीन कपाशी तूर या प्रमुख पिकांत सुद्दा पाणी साचले असून पिके खराब झाली असून त्याचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश नसल्याने शेतकरी वर्ग यांना क्षेत्रफळावर आधारित सुद्दा विमा धारक शेतकरी वर्ग यांचे पंचनामे करून कपाशी सोयाबीनचे नुसकाणीचे पंचनामे करून शेतकरी वर्गांना मदत देण्यात यावी अशी मागणी पाडळी शिंदे येथिल युवा कपाशी नुकसान ग्रस्त शेतकरी विणेश राजकुमार शेळके यांच्या कडून होत आहे.

“……विमा धारक शेतकरी यांचे पंचनामे करावे व ज्यांनी प्रत्यक्षात विमा काढलेला नाही त्यांची अवस्था फार बिकट होत असून त्यांनी कोणाकडे क्षेत्रफळ नुकसान भरपाई मागावी हा प्रश्न उपस्थित होत आहे .तसेच विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी विमा धारक शेतकरी यांना क्रॉउप इन्शुरन्स या अँप मधून नुसकाणीची माहिती द्यावी लागते त्यात माहिती देण्यासाठी बहुतेक शेतकरी वर्ग यांच्या कडे स्मार्ट फोन नसल्याने त्यांना दुसऱ्या व्यक्तीकडून माहिती भरून घ्यावी लागत आहे एवढे मात्र निश्चित!