Home बुलडाणा अवैध रेती माफियांनी रस्त्यावरच आडवे लावले वाहन!

अवैध रेती माफियांनी रस्त्यावरच आडवे लावले वाहन!

449

महसूल चे पथक रिकाम्या हाथाने परतले ,

डिग्रस बु रेती घाटावरील घटना!

 

  1. हनिफ शेख

अंढेरा/प्रतिनिधी
देऊळगाव राजा तालुक्यात खडकपुर्णा नदितुन अवैध रेती उपसा सुरुच असुन अवैध रेती माफियां शासनाचा कोटी रुपयांचा महसुल बुडवत आहे.अवैध रेती माफियांविरोधात देऊळगाव राजाच्या तहसिलदार सारिका भगत ह्या वारंवार अपयशी ठरत आहे.दि.१० सप्टेंबर च्या संध्याकाळी साडेसहा वाजता देऊळगाव राजाचे नायब तहसिलदार विकास राणे हे त्यांच्या महसुलच्या टिमने डिग्रस रेती घाटावर अवैध रेती माफियां याच्यावर कार्यवाही करण्यासाठी सरकारी वाहन क्रं एम.एच.२८ सी,६७६७ जात असतानां ग्राम
डिग्रस बु फाट्याजवळ जात असतानां एक पांढऱ्या रंगाची बोलेरो क्रं.एम्.एच.२८व्ही ७८४४ ही गाडी रस्त्याच्या मधोमध आडवी लावलेली होती.सदर गाडीच्या मागच्या बाजुला सोनु मांटे मो.80988904650,7214917880 असे लीहीलेले आहे.सदर गाडीचे नायब तहसिलदार विकास राणे यांनी बोलेरो गाडीचे फोटो मोबाईल मध्ये काढलेले आहे.
दि.१० सप्टेंबर २०२०ला राञी नऊ वाजता सोनु मांटे विरोधात नायब तहसिलदार विकास राणे यांनी कलम १८६ प्रमाने गुन्रहा दाखल केला असुन आरोपीला अजुनही अटक केलीली नसुन लवकरच अटक करण्यात येईल अशी प्रतिक्रिया बिट जमदार विकास देशमुख यांनी दिली.

भर पावसाळ्यात अवैध रेती उपसा सुरुच?
या वर्षी चांगला पाऊस झाला असुन खडकपुर्णा प्रकल्प पुर्णपणे भरलेला आहे.खबारदारी म्हणून खडकपुर्णा धरणातुन पाण्याच विसर्ग सुरुच असीन खडकपुर्णा नदीलाच्या पाञातुन अवैध रेती माफियां अवैध रेती उपसा करतच आसुन महसुल प्रशासन अवैध रेती माफियाःसमोर हतबल झाल्याचे दिसत.

रेती माफियांची दादागिरी सुरुच?
अवैध रेती माफियां हे महसुलचे मंडळ अधिकारी,नायब तहसिलदार,यांच्या अंगावर गाडी घालणे,भर रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करणे,दादागिरी करुन शिवीगाळ करणे,महसुलच्या अधिकाऱ्यांसोबत धक्काबुक्की रणे,ह्या घटना तालुक्यात घडतच आहे.महसुलच्या आधिकार्यावर विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल करणे.अशा घडना वारंवार घडत असुन महसुल प्रशासनाकडुन अवैध रेती उपसा काही केल्या बंद झालेला नसुन जिल्ह्याला लाभलेले नवीन जिल्हाधिकारी एस्.राममुर्ती हे काय कार्यवाही करतात याकडे समस्त जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे.