Home विदर्भ उपजीविका अभियानातील कर्मचार्यांच्या उपजीविका धोक्यात…!

उपजीविका अभियानातील कर्मचार्यांच्या उपजीविका धोक्यात…!

3152

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ – स्वतःच्या स्वार्थापोटी मा. मंत्री, ग्रामविकास श्री हसन मुश्रीफ, श्री अरविंद कुमार ,अतिरिक मुख्य सचिव ग्रामविकास, श्री. प्रवीण जैन मुख्य कार्यकारी अधिकारी, MSRLM यांनी आज MSRLM अभियानांतर्गत कार्यरत जवळपास ३५०० कंत्राटी कर्मचार्यांच्या रोजगारावर गदा आणली. आज दिनांक १० सप्टें २०२० MSRLM मार्फत पत्र काढून शासनाने सर्व कंत्राटी कर्मचार्यांच्या जिवंत कत्तली केल्या आहेत. या पत्रानुसार राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचार्याचे कंत्राटचे नुतनिकरन न करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना देण्यात आलेले आहेत.
मा. मंत्री, ग्रामविकास श्री हसन मुश्रीफ, श्री अरविंद कुमार ,अतिरिक मुख्य सचिव ग्रामविकास, यांच्या अहं पायी आणि स्वतःच्या स्वार्थापोटी (अतिरिक्त कमाई करिता ) ज्यांनी अभियान उंच शिखरावर नेवून त्याला एक दिशा दिली अशा आर. विमला(भाप्रसे) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, MSRLM यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागेवर ज्यांना ACB ने लाच घेताना रंगे हात पकडले अशा श्री. प्रवीण जैन यांची नियुक्ती करण्यात आली. आल्या आल्या श्री. प्रवीण जैन यांनी आपला दूत पाठवून प्रत्येक राज्य अभियान व्यवस्थापक / अभियान व्यवस्थापक यांच्या दालनात पाठवून “आर. विमला(भाप्रसे) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, MSRLM यांशी कोणताही सबंध ठेवू नये तसेच श्री अरविंद कुमार ,अतिरिक मुख्य सचिव ग्रामविकास, यांनी कोणा कोणाला काढायचे यांची एक यादीच दिली आहे आणि त्यांना मी ठोकणारच” असे सांगितले. जणू त्यांनी सुपरिच घेतलीये. आर. विमला(भाप्रसे) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, MSRLM यांच्या पाठोपाठ श्री दादाभाऊ गुंजाळ यांची बदली केली गेली.
ज्यांनी रोजगार व कौशल्य विकास च्या माध्यमातून ddugky योजना राज्यात प्रभावीपणे अमलात आणली अशा जॉर्ज बर्नाड शा यांना देखील बळजबरीने एका दिवसात राजीनामा द्यायला लावला. मनुष्य बळ संसाधन विभागातील गुप्तहेर श्री रामदास धुमाळे ज्यांनी आपल्या विशेष शैलीतून अनेकांच्या नौकर्या खाल्यात त्यांना देखील आज कामावरून कमी करण्यात आले. श्री हरचेकर यांचा करार नुतनीकरण केला नाही. श्री प्रभाकर गावडे यांचा करार नुतनीकरण केला नाही. श्री विशाल जाधव यांना देखील कमी करण्याची ताकीद देण्यात आली आहे. एकंदरीत राज्य अभियान कक्षातील सर्वच व्यवस्थापक यांना काढून टाकण्यात येणार आहे. त्यासोबतच जिल्हा, तालुका आणि प्रभाग समन्वयक, CRP देखील ठेवणार नाहीत. एकंदरीत या शासनाला योजना बंद पडायची आहे. कुठल्याही गोरगरीबाशी शासनाला काहीही घेणे नाही
मित्रानो, आज आर्थिक तुटवड्याचे कारण दर्शवून आपला घात केला जात आहे. कुठल्याही कायमस्वरूपी कर्मचार्याचा पगार कमी केला नाही अथवा त्यांना काढून टाकण्यात आले नाही. आमदार आणि खासदार यांचे पगार पेन्शन जशीच्या तशी मिळते आहे. मग आपल्या बाबतीच का? आपले सर्वच बचत गट, ग्रामसंघ, आपल्या CRP सर्वांना यांनी धारेवर धरले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात आमदार, खासदार यांना पत्र द्या आणि त्यांना भाग पाडा हा विषय गांभीर्याने घ्यायला
वेळ पाहून शासन खेळ करत आहे.. सावध व्हा! रात्र वैर्याची आहे.. आता नाही तर कधीच नाही… हा संदेश शासनापर्यंत पोहोचला पाहिजे, Share करा.

आपलाच कंत्राटी