Home मराठवाडा मराठा आरक्षण पेटलं , घनसावंगीत बसवर दगडफेक…

मराठा आरक्षण पेटलं , घनसावंगीत बसवर दगडफेक…

377
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना –  जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड पाटीजवळ आज शुक्रवारी , दुपारी गुंज कडे जाणाऱ्या महामंडळाच्या बसवर दोघांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत दगडफेक केली याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, अंबड आगाराची एसटी बस क्रमांक-एम.एच.२०बी.एल.२८८१ ही आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सिंदखेड पाटीजवळ आली.आंदोलन कर्त्यांनी प्रथम बसमधील प्रवाशांना बसमधून खाली उतरविले त्या नंतर समोरच्या बाजूने दगडफेक करून काचा फोडल्या.काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुणांचे रक्त खवळले , भडकलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे.. अशा संतप्त घोषणा देत व्यवस्थेविरुद्ध रोष व्यक्त केला बसवर दगडफेक करून  काचांचा भुगा केला.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी बस घनसावंगी बसस्थानकात लावली. बसचालक हाकणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे .