Home विदर्भ नुर संस्थेच्या स्थानांतरण प्रकरणात दोषींवर त्वरित कार्यवाही करा – मनसे

नुर संस्थेच्या स्थानांतरण प्रकरणात दोषींवर त्वरित कार्यवाही करा – मनसे

262
0

जि. प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर….

खोटा अहवाल देऊन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी शिक्षण विभागाचा खेळ – मनसेचा आरोप

यवतमाळ – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यवतमाळने नुर बहुउद्देशीय महिला शिक्षण्‍ संस्था राणी अमरावती, ता.बाभुळगांव, जि.यवतमाळ द्वारा संचालित उर्दू प्राथमिक शाळा गव्हाळा, ता.बाभुळगांव या शाळेचे यवतमाळ येथे नागपूर रोड बायपास येथे शाळा स्‍थलांतरीत करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने जि.प.यवतमाळ शिक्षण विभागा मार्फत चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी (शिक्षण) शिक्षण विभाग (प्राथमिक जि.प.यवतमाळ) यांना संबंधीत संस्थेचा अहवाल सादर करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने त्यांनी दि. 2/2/2018 रोजी शाळा तपासणीचा अहवाल कार्यालयात सादर केला. हा अहवाल खोटा असुन यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी शिक्षण विभाग खेळत असल्याचा आरोप मनसेचे अनिल हमदापुरे यांनी निवेदनातून मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भेटी दरम्यान केला.
शासनाने काही अटी र्श्तींच्या अनुषंगाने संबंधीत संस्थेला शाळा स्थानांतर करण्याकरीता मान्यता दिली. परंतु या प्रकरणत पुनश्च: तक्रार झाल्याने शिक्षण्‍ विभागाने उपशिक्षणाध्किारी दिलीप रावते. विस्तार अध्किारी राजु मडावी यांना संबंधीत संस्थेच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश्‍ दिले. या प्रकरणात स्थानिक बाभुळगांव तालुक्यातील नागरीकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेत वास्तविकतेत त्या गावातील परिस्थिती आणि विस्तार अध्किारी पोपेश्वर भोयर यांनी सादर केलेला अहवाल हा पूर्णत: विसंगत असून या नुसार स्थानिक मुस्लिम बहुल वस्तीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणर असुन न्याय मिळवून देण्याची मागणी मनसेकडे केली. या प्रकरणात जाणीवपुर्वक खोटा अहवाल सादर करुन गव्हाळा येथील ऊर्दूभाषीक विद्यार्थ्यांच्या शैक्षण्कि हिताकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार उघडकीस आला. वास्तविकतेत या गावात विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असुन या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाच हित लक्षात घेता हा शासनाशी दिशाभुल करणारा अहवाल जिल्हापरिषदेला सादर केल्याची माहिती समोर आली. या नुसार मनसेने शिक्षण विभागाकडे चौकशी केली असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचा तसेच या प्रकरणात खोटा अहवाल सादरकरणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला अभय शिक्षणविभाग देत असल्याची माहिती मनसेला मिळाली.
मनसेने मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प.यांना या प्रकरणात तात्काळ कार्यवाही करून विद्यार्थींचा शैक्षण्कि नुकसान करणाऱ्या विस्तार अधिकारी तसेच त्यांना पाठिशी घालणाऱ्या तत्कालीन शिक्षणाध्किारी व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद यवतमाळ यांना चुकीची व शासनाची दिशाभुल करणारी माहिती सादर केल्या प्रकरणी तात्काळ निलंबीत करुन बाभुळगांव तालुक्यातील गव्हाळा येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक हिताकडे लक्षदेता त्यांची शाळा त्यांना परत करण्यात यावी. असा निवेदन वजा ईशारा या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी दिला.यावर आपण लवकर प्रकरणात दोषींवर चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन मनसेला दिले .