Home जळगाव रावेरातील त्या निर्दयी वाहतूक पोलिसावर जिल्हा पोलिस प्रशासन कारवाई करणार का? रुग्णासह...

रावेरातील त्या निर्दयी वाहतूक पोलिसावर जिल्हा पोलिस प्रशासन कारवाई करणार का? रुग्णासह नातेवाईकांची आर्त हाक

363

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील दिनांक ९ /९/२०२० रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या वडीलांचा जेवणाचा डबा पोहचविणार्या मुलासह गाडी जप्त करण्याचे अमानवीय कृत्य रावेर पोलिस स्टेशन ला कार्यरत धांडे नामक वाहतूक पोलिसांनी केल्याने मोठा वाघोदा सह तालुक्यातील नागरिकांत कमालीचा रोष निर्माण झाला असून खाकी वर्दीतला दर्दी देवमाणूस हरवल्याचा भासही काल रावेर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे झाला आहे वडिलांच्या आजारपणामुळे व दवाखान्यात ‌उपचारार्थ दाखल एकनाअनेक विचारांनी त्रयस्त जेवणाचा डबा पोहचविणार्या मुलासह गाडी जप्त करीत या ना त्या कारणाने ५००/- रुपये दंडाची मागणी केली मात्र मुलाजवळ खिशात एक नया पैसा नसल्याचे रडून हात जोडून केविलवाणी विनंती करुनही या कठूर निगरगट्ट ह्रदयी धांडे नामक वाहतूक पोलिसाला मानवतेचा माणूसकीच्या जराही पाझर फुटला नाही उलट त्यांनी या त्रसत रुग्णांचे मुलास पोलिस स्थानकात दोन तास बसवून ठेवून मुलाने मोठा वाघोदा येथील आपल्या नातेवाईकांना दंडाची रक्कम देण्यास घेऊन बोलविले व दंड भरला मात्र या शिस्तप्रिय सत्यवादी वाहतूक पोलिसाने दंडाची रक्कम घेतली त्या गाडी व मुलास सोडले मात्र मेमो पावती न देता ऐडजेस्टमेंटच्या नावाखाली दंडाचे पैसे गडप करून आपल्या प्रामाणिकतेचे जिवंत उदाहरण काल घडलेल्या संतापजनक घटनेद्वारे दाखवून दिले जळगांव जिल्हा पोलिस प्रशासनाने गेल्या ५ महिन्यात विविध प्रकारचे जनसामान्यांना हितकार्य ,मदत , सहकार्य,अन्न वस्त्र निवारा अशा अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आपले कर्तव्य पार पाडले व पोलिसांतील खाकी वर्दीतला देवमाणूस म्हणून दिवसरात्र मदतीसाठी उभा ठाकला मात्र रावेर पोलिस स्थानकात कार्यरत धांडे नामक वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांने काल केलेल्या या संतापजनक कृत्यामुळे जनमानसात पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचे महान कार्य केलेले आहे तरी कर्मनिष्ठ कर्तव्यदक्ष कार्यक्षम जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी पोलिस प्रशासनाच्या नावलौकिकतेवर पाणी फेरणार्या या कठूर निर्दयी मानवता धर्म हरवलेल्या वाहतूक पोलिसाची अमाणूसकिय गैरवर्तणूकीची दखल घ्यावी व कठोर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह स्वयं रुग्ण व त्रयस्त कुटूंबिय व जनसामान्यांन नागरिकांतून होत आहे.