Home मराठवाडा मांडवी  पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

मांडवी  पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

19
0

मजहर शेख

आरोपी फरार…

नांदेड / किनवट , दि. १० :- किनवट तालुक्यातील मांडवी पोलीस ठाण्यात तील पोलीस कर्मचारी दुसऱ्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केल्यावरून मांडवी पोलीस ठाण्यात दोघांवर शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपाखाली गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी मांडवीच्या आठवडी बाजारातील मटण मार्केट जवळील अन्नपूरणा बियर बार च्या मागे सपोनी संतोष केंद्रे हे एका दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासात गेले .
त्या ठिकाणी काही लोक अवैधरित्या जुगार खेळत होते पोलीस अधिकाऱयांना पाहताच तेथील लोक सैरावैरा पळाले.सपोनि संतोष केंद्रे त्या ठिकाणी गेले असता आरोपी बार मालक धनलाल पवार व त्यांचा मुलगा दुलाजी पवार यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली व शासकीय कामात अडथळा केला.
यामुळे सपोनि संतोष केंद्रे यांच्या फिर्यादीवरून मांडवी पोलिसात कलम 353, 294, 506, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपास पीएसआय शिवप्रसाद कराळे हे करीत असून आरोपी फरार आहेत.या घटनेमुळे गावात सगळीकडे एकच चर्चा जोर धरली आहे.