Home सोलापुर केएलई कडून हरवाळकर यांचा सत्कार

केएलई कडून हरवाळकर यांचा सत्कार

88
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. १० :- बहुजनांचा बसवधर्म या साहित्य कृतीच्या उत्कृष्ठ लेखनाबद्दल राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने,शरण सेवा समिती,लातूर यांनी स्वामींनाथ हरवाळकर यांना सन्मानित केले होते. त्या बद्धल केएलई मंगरुळे प्रशालेने त्यांचा सत्कार केला.
आमदार सचिन कल्यांणशेट्टी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शालेय नियामक मंडळाचे सदस्य अँड.अनिल मंगरुळे होते.या वेळी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, सुमारे दोन तपापासून हरवाळकर यांनी बसवधर्माची पताका तळपत ठेवली असून आता महाराष्ट्रातील मराठी पट्ट्यात ही चळवळ जोर धरली आहे.बहुजनांचा बसवधर्म या पुस्तकाच्या पाच लाख प्रती विकल्या असून ती रक्कम गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्ची घातली आहे.
यावेळी मुख्याध्यापक गिरीष पट्टेद,काशीनाथ चितली, चंद्रकांत जोकारे,दत्तात्रय पाटील,प्रशांत पाटील, विश्वनाथ कलशेट्टी,संजय चितली,बसवराज माडजे आदि मान्यवर उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting