Home विदर्भ काजळसरा येथे ग्रामीन शिबिराचे उद्द्घाटन .!

काजळसरा येथे ग्रामीन शिबिराचे उद्द्घाटन .!

31
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १० :- जिल्ह्यातील देवळी येथील बी.के.समाजकार्य महाविध्यालय, देवळी या महाविध्यालयातील M S W – 2 sem च्या विद्द्यार्थ्यांचा काजळसरा येथे 09-01-2020 रोजी निवासी ग्रामीण शिबिराचे उद्द्घाटन झाले.या कार्यक्रमचे अध्यक्ष मा.श्री.डॉ.नरेंद्र मदनकर , उपाध्यक्ष नगर परिषद देवळी हे होते .कार्यक्रमाचे उद्द्घाटन म्हणून मा.सौ.सिंधू ताई ठाकरे , सरपंच ग्रामपंचायत कजळ्सरा हे होत्या.प्रमुख अतिथी म्हणून डॉ.प्रितमजी खडसे, व मा.डॉ.बाबा शंभरकर , मा अभीषेक सावरकर,श्री .बी .के .समाजकार्य महाविद्यालय देवळी चे कार्यकारी प्राचार्य श्री.सुनिल सुर्वे सर व ग्रामीण शिबिर प्रमुख प्रा.अंकित गिरमकार सर हे कार्यक्रमास उपस्थीत होते.
अध्यक्षीय भाषण डॉ. मा. नरेंद्रजी मदनकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनामध्ये ग्रामीण भागामध्ये घडून येत असलेले विधटन, ग्रामीण शिबिराचे महत्व, ग्रामीण भागातील बदललेली संस्कृती इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकला.
तसेच कजळसरा येथील सरपंच मा.सौ.सिंधूताई ठाकरे उदघाटनीय भाषनामध्ये विद्यार्थ्यांना कजळसरा येथे कार्याकम आयोजित केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या, व सहकार्याची भावना व्यक्त केली.
सुनील सुर्वे यांनी आपल्या भाषणामध्ये ग्रामीण शिबिरातून विद्यार्थ्यांचा कौशल्य गुणांचा विकास घडून यावा. आयोजन करणे, नियोजन करणे, कार्यान्वित करणे, वेळेचा उपयोग, संप्रेक्षणाचे कौशल्य, चमू भावना, संबंधाची हाताळणी संघर्ष व मतभेद निर्णय घेणे, मूल्यांकन करणे, योग्यता ओळखणे, साधन सामग्रीचे वितरण, नेमून दिलेले काम, परिस्थितीला तोंड देणे, सहकार्य व समन्वय या कौशल्य गुणांचा तसेच ग्रामीण समुदायातील जीवन पद्धतीचा प्रत्यक्ष अभ्यास करणे. सामुदायामध्ये झालेले बदल व सामाजिक, राजकीय, आर्थिक, संरचना जाणून घेणे. व ग्रामीण शिबिराचे महत्व आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले .
तसेच ग्रामीण शिबिर प्रमुख प्रा. अंकित गिरमकर सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये ग्रामीण शिबिराचे उद्देश सांगितले, ग्रामीण संरचनेचा अंभ्यास करणे, गावातील संमस्या जाणून घेणे व समाजातील समस्या सांस्कृतिक कार्यामध्ये पथनात्त्याद्वारे जनजागृती करणे दुपारी बौद्धिक सत्रा मध्ये वेगवेगळ्या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार, निवासी ग्रामीण शिबिरामध्ये 7 दिवसांमध्ये घडवून येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाची थीम भारतीय संविधान जनजागृती ठेवण्यामागची पाश्र्वभूमीका त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. प्रत्येक व्यक्ती आपला अधिकार मागतो, मात्र संविधानाने दिलेल्या कर्तव्याची जाणीव, मूलभूत अधिकार, नितीनिर्देशक तत्वे, legal social awareness याबाबतची माहिती आपल्या प्रस्ताविकेमध्ये सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गजभिये व आभार प्रदर्शन स्वाती राठोड यांनी मानले. तसेच गावातील गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting