Home बुलडाणा अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकर्याची विहीर खचली

अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकर्याची विहीर खचली

109
0

-रवि जाधव

देऊळगाव मही:-येथील कायम रहिवाशी तुकाराम भिमराव शिंगणे व भिकाजी भिमराव शिंगणे या शेतकर्याची शेती हि वाकी खूर्द शिवारातील यादी भाग क्रमांक 43/1/ब मधील असून 10 ते 18 आॅगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी मुळे या शेतकर्याची पुर्ण विहीर खचली व तिच्यात 5 हाॅर्स पावरचा पंप सुध्दा जमीनदोस्त झाला. अगोदरच लाॅकडाऊनचा काळ असल्यामुळे शेतकरी वर्गाच्या हाताला काम नाही त्यातल्या त्यात पैशाचा तुतवडा यामुळे शेतकरी खूप मोठया आर्थिक कचाट्यात सापडला आहे.रब्बी हंगामात शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी , वर्षाभराची कुणबीक हाकण्यासाठी , गुरांना पाणी पिण्यासाठी व वैरनासाठी या शेतकर्याकडे फक्त विहीरीचा सहारा होता. परंतु विहीर खचल्या मुळे आता सर्व बाबीच न होणार नुकसान या शेतकर्याच होणार असून त्यांना आता नवीन विहीर बांधण्या करीता शेतकरी हवालदिल व हतबल आहे.करीता नवीन विहीर बांधण्याकरिता या शेतकर्याना शासनाकडून आर्थिक मदत हवी आहे. हि बाब लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर घटनास्थळी पंचनामा करून शेतकर्यांना आर्थिक मदत मिळवून दयावी अशी मागणी परिसरातून व दुर्घटना ग्रस्त शेतकर्याची आहे.

Previous article
Next articleतीन एकर सोयाबीनच्या उभ्या पिकावर चालवले रोटावेटर
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.