Home मराठवाडा
279
0

पोलिसांची गोळ्या झाळून आत्महत्या

उडाली खळबळ ,

 

प्रतिनिधी ,

जालना पोलीस मुख्यालयात सहायक फौजदाराची सुभाष गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत*

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड हे आज सकाळी 8.45 वा. दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. स्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यातच ते गतप्राण झाल्याचे समजते. घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत.