Home विदर्भ तीन एकर सोयाबीनच्या उभ्या पिकावर चालवले रोटावेटर

तीन एकर सोयाबीनच्या उभ्या पिकावर चालवले रोटावेटर

172

वर्धा / नारायणपूर , ( बंडू बन ) –  गेल्यावर्षी पावसाने पिकाचे नुकसान केले परत यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन पेरले भरपूर मेहनत करून सुद्धा सोयाबीनचे झाड वाढले. परंतु शेंगा लागल्या नाही. या चिंतेत शेतकरी संजय मारोतराव कश्टी यांनी उभ्या पिकावर रोटावेटर चालवून तीन एकर शेतातील पीक उद्ध्वस्त केले. समुद्रपूर तालुक्यातील कवठा निवासी शेतकरी संजय कश्टी यांच्याकडे नावाला तीन एकर शेती आहे. या तीनी एकरात त्यांनी सोयाबीनचे पीक पेरले होते. या सोयाबीन वर खूप मेहनत करून सुद्धा सोयाबीनचे झाड वाढले मात्र शेंगाच लागल्या नाही. हजार रुपये खर्च करून सोयाबीनला शेंगा न आल्याने शेतकरी चिंताग्रस्त होता. या शेतकऱ्यांने विविध उपाययोजना करून पाहिले एवढेच नाही तर कृषी विभागाला सुद्धा या बद्दलची माहिती दिली .मात्र काहीही फरक पडला नाही अखेर संजय कश्टी यांनी तीन एकर सोयाबीन च्या उभ्या पिकावर रोटावेटर चालवण्याचा निर्णय घेतला.