Home विदर्भ दिघी बोपापूर रस्त्यावर यशोदा नदीच्या पुलाला भेगा पडल्याने वाहतूक ठप्प.!

दिघी बोपापूर रस्त्यावर यशोदा नदीच्या पुलाला भेगा पडल्याने वाहतूक ठप्प.!

390

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

मोठया अपघाताची शक्यता” , देवळी-दिघी बोपापूर वाहतुकीवर परिणाम

 

हा पुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद.! बांधकाम विभागाच्या सुचना.

वर्धा – जिल्ह्यातील देवळी – दिघी बोपापूर जाणाऱ्या रस्त्यावरील यशोदा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने आज शनिवारी सकाळी वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती.मुख्यतः हा मार्ग देवळी- दिघी बोपापूर जाणारा असून या मार्गावरील सर्व वाहन जाणारे थांबले असून या गावांचा देवळी शहराशी संपर्क येतो.मार्गावरील गावांचा मुख्य मार्ग असल्याने पुलाला तडे पडल्याने पुलावरुन येणे जाणे करणे धोक्याचे झाले आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात हा पूल नुकसानग्रस्त झाला होता.परंतु प्रशासनाने तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरळीत केली होती.
शेतीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गाला औषधी,खते नेण्यास पुलामुळे वाहतूक खोळंबल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक शेतकऱ्याची शेती नदीच्या पलीकडे आहे.शेती साहित्य,बैलजोडी नेण्यास अडचण निर्माण होत आहे.आकस्मिक काळात किंवा रुग्णांना मार्ग बंद असल्यामुळे उपचाराला सुद्धा मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.अनेक वर्षापासून असलेल्या पुलामुळे दरवर्षी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने नवीन पूल बांधण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.प्रशासनाचे अती महत्वाच्याझ बाबी कडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.
या रस्त्यावर भेगा पडल्या मुळे हा पुल नदीच्या आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पुलच वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात दिघीचे सरपंच घनश्याम कांबळे यांनी बांधकाम विभागाला कळविताच तातडीने देवळी चे बांधकाम विभागाचे अधिकारी घटना स्थळी जावून पुलाची पहाणी केली.व या पुलावरून वाहतुक बंद करण्याच्या सुचना दिल्या असुन हा रस्त्याच बंद करून पावसाळा संपला की या रस्त्यावर पुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे देवळी चे बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनिअर पैठणकर यांनी सांगितले आहे. नदिला जो पर्यंत पाणी आहे तो पर्यन्त बांधकाम करता येणार नसल्यामुळे हा रस्ता बंद करावा लागत आहे. असे पैठणकर यांनी सांगितले.