Home जळगाव महिला पोलीस नाझीम पिंजारी बिहारच्या सामाजिक संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत

महिला पोलीस नाझीम पिंजारी बिहारच्या सामाजिक संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत

35
0

रजनीकांत पाटील

अमळनेर– अमळनेर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी श्रीमती नाझीमा गफ्फार पिंजारी यांना प्रगती आदर्श सेवा केंद्र समस्तीपुर बिहार या संस्थेने कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत रात्रंदिवस आपल्या कार्यक्षेत्रात कार्य करणारे जनतेच्या सुरक्षेसाठी झटणारे श्रीमती नाझीमा पिंजारी संपूर्ण शहरात कोरोनाचा वाढता धोका निर्माण झाला असून अश्या परिस्थिती मध्ये आपल्या स्वतःची जीवाची पर्वा न करता जनतेला योग्य मार्गदर्शन देऊन शहरातील तसेच पोलीस ठाण्यातील परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली आहे श्रीमती नाझीमा पिंजारी यांच्या कार्याची दखल घेत आदर्श सेवा केंद्र समस्तीपुर बिहार यांनी त्यांचा गौरव केला आहे.
एक डिजिटल प्रमाणपत्र पाठवून संस्थेचे सचिव संजय कुमार बबलू यांनी गौरव केला आहे.

Unlimited Reseller Hosting