मराठवाडा

राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे दै पुढारी चे अविनाश घोगरे मानकरी

Advertisements
Advertisements

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना जिल्ह्यातील विशेष करून घनसावंगी तालुक्यातील सुज्ञ जनतेस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की जालना जिल्ह्यात सामाजीक व शैक्षणिक स्तरावर कार्य करणारी डी एम सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने ह्या वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या पत्रकार, संपादक, वार्ताहर , यांच्या कार्याचा विचार करून ,त्यांच्या सामाजिक बांधिलकी चां सर्वांगीण विचार करून, त्यांच्या कृतुत्वाचा सन्मान म्हणून, त्यांच्या कार्याचे उचित मूल्यमापन व्हावे यासाठी,ह्या वर्षांपासून फाऊंडेशन पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार देणे सुरू करत आहे, पत्रकारिता क्षेत्रात अती उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,सामजीक प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून हिरारीने मांडणाऱ्या, आपल्या लेखणी च्या माध्यामातुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेणाऱ्या व समाजहित जोपासणाऱ्या व्यक्तीस पहिला राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार घोषित करण्यात येत आहे..

ह्या वर्षीच्या फाऊंडेशन चा प्रथम राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार विजयाचे मानकरी घनसावंगी तालुक्यातील भूमिपुत्र व दैनिक पुढाराचे पत्रकार अविनाश घोगरे हे ठरले आहेत.
डी एम सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन महाराष्ट्र च्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत

हे पण वाचा

पत्रकार अविनाश घोगरे हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अनेक वर्षांपासून निर्भीड,निःपक्ष पत्रकारिता करीत आहेत, आपल्या पत्रकारितेतुन त्यांनी आजवर अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळेच एकंदरीत त्यांच्या कार्याचा गुण गौरव म्हणूनच ते ह्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कारा साठी पात्र ठरले आहेत….
प्रा.डी. एम.सर
डी एम सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन महाराष्ट्र

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...