Home बुलडाणा रेणुकामाता स्कुल अँड ज्युनियर कॉलेज येथे शेतकरी महिलेच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

रेणुकामाता स्कुल अँड ज्युनियर कॉलेज येथे शेतकरी महिलेच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

218
0

 

 

प्रा , तंजिम हुसेन

चिखली : दि १५ ऑगस्ट रोजी रेणुका माता स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे महिला शेतकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेणुकामाता ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक वृंद शहरातील मान्यवरांकडे स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आले असता रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांच्या हस्ते स्वतंत्रदिनी ध्वजारोहण करण्याची ईच्छा व्यक्त केली असता त्यांनी यावेळेसच ध्वजारोहण माझ्या हस्ते न करता आपण एखादया शेतकरी कष्टकरी महिला यांच्या च हस्ते ठेवण्यास सांगितले तात्काळ सदर शिक्षक वृंद यांनी त्यांना होकार देत भालगाव येथील कष्टकरी शेतकरी महिला सौ. लक्ष्मीबाई इंगळे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ठीक ७ :४५ला रेणुका माता कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण समारंभ एका महिला शेतकरी महिला यांच्या हस्ते करण्यात आला,तसे बघितले असता गावच्या सरपंचा पासून आमदार ,खासदार ,मंत्री व इतर मान्यवरांच्याच हस्ते सर्वत्र ध्वजारोहण केल्या जाते परंतु या परंपरेला फाटा फोडून खऱ्या अर्थाने शेतकरी चळवळीशी नाळ जुडलेली असलेल्या रयत रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांच्या म्हणण्यानुसार रेणुका माता ज्युनियर कॉलेजमध्ये प्राधान्यक्रम शेतकरी महिलेला देण्यात आले, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमाचे पालन करून अगदी ठराविक मान्यवरणांच्या उपस्थितीत एका सामान्य शेतकरी महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला.

Unlimited Reseller Hosting