Home मराठवाडा गांवचे वैभव सोनाजी कंटुले यांना कोविड योद्धा म्हणून प्रशासकीय सन्मान पुरस्कार

गांवचे वैभव सोनाजी कंटुले यांना कोविड योद्धा म्हणून प्रशासकीय सन्मान पुरस्कार

283
0

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी आणि घनसावंगी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय विभागात औषध निर्माण अधिकारी असलेले सोनाजी कंटुले यांनी कोरोना महामारीच्या काळात मागील पाच महिन्यांपासून नागरिकाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल, उत्कृष्ट बजावल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले आहे. कोरोनाच्या भितीने लाॅकडाउनच्या काळात सुरक्षित ठिकाण म्हणून अनेकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. परंतु सोनाजी कंटुले यांनी एकही दिवस सुट्टी न घेता प्रशासकीय सेवेत कार्यरत राहीले घनसावंगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, नायब तहसीलदार गौरव खैरनार, मोरे पंचायत समिती सभापती भागवत रक्ताटे, उपसभापती बन्शीधर शेळके, नगराध्यक्ष राज देशमुख, गटविकास अधिकारी गुंजकर, नगर पंचायत मुख्याधिकारी मांडुरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Unlimited Reseller Hosting