Home विदर्भ पोळा संदर्भात प्रशासनाने याचा फेरविचार करावा

पोळा संदर्भात प्रशासनाने याचा फेरविचार करावा

118
0

अनुप चव्हाण मुख्य संयोजक , शेतकरी वारकरी संघटना

यवतमाळ – ग्रामीण भागातील सर्वात महत्वाचा व मोठा सण म्हणजे पोळा पण करोनामुळे थेट हा पोळा न भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे कितपत योग्य वाटते आम्हा प्रत्येक शेतकरी ला भीती वाटते की करोना संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला सर्व ग्रामीण भागातील शेतकरी बंधूनी सहकार्य केले आहे. पण पीककर्जासाठी बँकेत गर्दी तहसील कार्यालयात फेरफार व नकाशा काढायला रोज 11 ते 5 वेळी हजार ते दोन हजार लोक गर्दी करतात खिडकी जवळ रांग पहा दारूच्या दुकानात मोबाईल शॉप व अन्य ठिकाणी कुठेच लोकांना करोना ची भीती वाटत नाही एवढी गर्दी कोणत्याही प्रकारचा नियम पाळले जात नाही व शहरात रोज करोना पॉझिटिव्ह निघत आहे पण ग्रामीण भागात हा आकडा एक टक्का ही नाहीत तरी ग्रामिण भागात पोळा बंदी घातली आहे पोळा सण हा फक्त गावपूरता मर्यादित आहे यात शंका नाही बाहेरून कुणी या उत्सवात सहभाग नोंदवत नाही व फक्त 1 तासात किंवा 30 मिनिटात पोळा पूर्ण होतो. तिकडे स्टॅम्प पेपरसाठी 10 / 10 तास लागतात हजारो लोक चिपकुन रांगेत उभे राहून वाट पाहात असतात तेथे शहरातील विविध ठिकाणाहून लोक येऊन गर्दी होते आणि पोळ्यात प्रत्येक जोडी आणि शेतकरी यांचे अंतर 3 फुटाचे असते तुम्ही नियम कायदे आता बनविले पण आम्ही पिढीजात नियमात आहोत , लोकडाऊन आता शहरात समजले आम्ही दरवर्षी गावबांधनि करतो या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हिरमोड झाला असून यावर प्रशासनाने फेरविचार करावा.

Unlimited Reseller Hosting