Home जळगाव यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करावा – उपविभागीय पोलिस अधिकारी...

यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करावा – उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे

189

निखिल मोर

पाचोरा – आपल्या श्रद्धांच्या आड शासन प्रशासन येणार नाही मात्र यंदाचा गणेशोत्सव हा कोरोना साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, यासाठी मंडळांनी घ्यावयाची विशेष काळजी, शासनाचे विविध दिशा निर्देश आदी विषयांची माहिती देण्यासाठी आज शहरातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, बँड व डीजे चालक तसेच पत्रकार बांधवांची संयुक्त बैठक पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे हे उपस्थित होते. मंचावर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे पत्रकार प्रवीण ब्राह्मणे हे उपस्थित होते. यावेळी आगामी गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करता येईल याबाबत ईश्वर कातकड़े यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलतांना ते म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करावा,सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीची उंची 4 फूट पेक्षा जास्त असू नये,प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती शक्यता वापरू नये,गणपती बसवतांना व विसर्जन मिरवणूकिला परवानगी नाही,मंडळांनी रक्तदान शिबिर, प्लाझमा दान शिबिर, आरोग्य शिबीर,स्वच्छता मोहीम ,वृक्षारोपण असे समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेश मंडळांना प्रशासनाकडून योग्य बक्षीस देऊन गौरवण्यात येईल अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. तसेच कोणत्याही डी जे अथवा बँड ला परवानगी देता येणार नाही मात्र गणेश मंडळांनी दरवर्षाप्रमाणे पोलीस स्टेशनची व जागेची आवश्यक परवानगी घेणे आवश्यक राहील तसेच मंडळांनी आपल्या भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनासाठी फेस बुक पेज तयार करावे व भाविकांना ऑनलाइन दर्शनाचा लाभ द्यावा , तसेच भाविकांना मंडळ स्थळी सामाजिक अंतर, सॅनिटायझर ,मास्क आदी बाबींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच मंडपात पाच पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी थांबू नये अशा सूचना देण्यात आल्या तसेच मंडळांनी दिवसातून तीन वेळा मूर्ती व परिसर सॅनिटीएझ करावा तसेच मंडळाच्या शेजारी कोणतेही दुकाने लावता येणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली तर विसर्जनासाठी पाण्याचे कृत्रिम तलाव तयार करून त्यात मूर्त्यांचे विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळ व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही यावेळी बजावण्यात आले. बैठकीला पत्रकार सुनील पाटील, विनायक दिवटे, विजय पाटील, नगराज पाटील, गोपनीय शाखेचे नितीन सूर्यवंशी, सुनील पाटील यांचे सह पोलीस कर्मचारी बांधव उपस्थित होते.