विदर्भ

अन्…” रवी ” किरणांनी ” सानिका ” भारावली

Advertisements
Advertisements

रवि भाऊ ढोक यांची ११ हजारांची मदत

देवानंद जाधव – मंगरूळ

यवतमाळ – पुञ वियोगाचे दुःख असंख्य पुण्यवंत मातां पित्यांनी भोगलयं, सात मुलांच्या मृत्यू नंतर देवकीने कृष्णाला यशोदेच्या हवाली केलंय, पुञ राज्याभिषेका ऐवजी रामाचा वियोग वनवास, कौशल्ये च्या नशिबी आला, आणि पाच पांडवांची माता असुनही कुंतीची कुस कर्णा साठी रिकामीच राहीली, देव देवताही सुटल्या नाहीत अशा भोगातुन, आपण तर सामान्य माणसं आहोत, हे तळहातावरील नाजुक रेषा या नाटकातील हृदयस्पर्शी संवाद जणु यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती रवी भाऊ ढोक यांच्या कानामध्ये घोंगावत असावा, स्वतःचा लाडाचा लेक अगदी वळना वरच्या वयात परलोक प्रवासाला निघुन गेलाय, “दर्शन “चे आता जिवनभर ” दर्शन “होणार नाही, ही केवळ कल्पनाच माणसाचं काळीज घायाळ करणारी आहे, तरीही आभाळभर दुःखाचं गाठोडं बाजुला सारत, रवि भाऊंची सामाजिक ऊत्तरदाईत्वाची जाणीव जागृत झाली .” बापाची तिरडी अंगनात, अन् लेक गेली परिक्षा केंद्रात ” या मथळ्याखाली मी लिहीलेली बातमी वार्याच्या वेगाने पसरली. त्याच दिवशी सानिका सुधाकर पवार या हिरकणीचा संस्कृत विषयाचा पेपर होता, दुःखाचा आवंढा गिळत परिक्षा केंद्राची वाट धरली, अन् त्या विषयात १०० पैकी १०० आणि अन्य विषयात ९८ टक्के गुण मिळविले, “अहंम जनपद अधिकारी भुत्वा पितृ स्वप्नपूर्ती करिष्यामी ” अर्थात मला जिल्हाधीकारी होऊन दिवंगत बापाचे स्वप्न साकार करायचे आहे. अशी दुर्दम्य इच्छाशक्ती तिच्या पोलादी मनात ढासुन भरलेली आहे, आयुष्यात अनेक नागमोडी वळणं येत असतात, ती काही काट्यांनी तर काही फुलांनी भरलेली असतात, पण माणसाने काटेरी वळनेच निवडायची असतात ,कारण रुतलेला काटा पायातुन काढल्यावर जेवढे समाधान वाटते, तेवढे फुलांवरुन चालतांना वाटत नसते. असा मोलाचा संदेश लोकनेते जि.प.चे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी यावेळी सानिकाला दिला.आणी मायेच्या ममतेने पाठीवर कौतुकाची थाप मारली. शिवाय स्व.दर्शन रवि ढोक यांचे स्मृती प्रित्यर्थ शैक्षणिक सहाय्य म्हणुन ११ हजार रुपयाची मोलाची मदत केली. या हृदयस्पर्शी समयी पवार परिवारासह तमाम उपस्थित मान्यवरांचे डोळे डबडबुन आले. बाळासाहेब मांगुळकर, रवी ढोक ( सभापती कृ .ऊ.बा .समिती ) रमेश भिसनकर सरपंच, अजय राठोड, श्रीकांत आडे, चंद्रशेखर गायकी, शुभम लांडगे, अमोल मेहर, लखन पवार, अशोक डाके, राजु गोरख, शेख सत्तार, संतोष मरगट, शेखर अतकरी, तुषार महेर, बाबाराव मंडलवार, आदींनी तो क्षण डोळ्यांत साठवून घेत,आपल्या लेकराबाळांसाठी कष्ट ऊपसता ऊपसता दृष्टीआड झालेल्या सानिका च्या बापांच्या सुधाकर गोविंदराव पवार च्या त्या असंख्य पाउलखुणांना विनम्र अभिवादन करत, सर्वांनीच जड अंत:करनाने परिवाराचा निरोप घेतला.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...