महत्वाची बातमी

जलसंपदा पुन्हा पोरकेच …

Advertisements
Advertisements

जलसंपदा विभागातून प्रधान सचिव इकबाल सिंग चहल यांची नगर विकास विभागात बदली झाल्यानंतर जलसंपदा ला कोण हा प्रश्न पडला होता. गाजत वाजत असलेले जलसंपदाचे प्रधान सचिव पद प्रवीण परदेशी यांच्याकडे आले, ते पण अतिरिक्त. या तीन महिन्याच्या काळात प्रवीण परदेशी यांचे मात्र महाराष्ट्रात मन लागत नव्हते. याची कारणे अनेक असतील. ते तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होते. सत्ताबदल झाला आणि सारी पाटातील गोट्याही इकडे-तिकडे पांगू लागल्या. जलसंपदा अत्यंत महत्त्वाचे खाते पण बीना प्रधान सचिवाचे. ज्या खात्यातील पाण्यावर शेतकऱ्यांचे, गांवक-याचे, शहरवासीयांचे कारखानदारांचे भवितव्य अवलंबून आहे अशा या महत्त्वपूर्ण खात्याकडे कुणाचेही लक्ष नाही, की राज्यकर्त्यांना मनासारखा पूर्णवेळ काम करणारा अधिकारी सापडत नाही. काही असो पण जलसंपदाला प्रधान सचिव मिळेनासा झाला. प्रवीण परदेशी जलसंपदात आले हा सुखावह क्षण होता. त्यांचा दर्जा हा अतिरिक्त मुख्य सचिव या पदाचा असल्याने व त्यांनी मागील भाजपाच्या कार्यकाळात केलेले काम, त्यामुळे निर्माण झालेला त्यांचा दबदबा, जलसंपदाच्या कामी येईल आणि जलसंपदाचे कार्य राफेल पेक्षा वेगाने पुढे जाईल असे वाटले होते, पण हे स्वप्नच राहिले. हे या विभागाचे दुर्दैवच. चहल साहेब असतांना जलसंपदा विभाग शांतपणे चालत होता. ती चाल शांत असली तरी ती निरंतर होती. त्याचा स्वभाव मन मोकळा होता. त्यांना आपल्या मर्यादा माहित होत्या. ते कधी बदल्यांच्या, रेती सारख्या निविदाच्या भानगडीत पडले नाही म्हणूनच महाजनान सारखे मुरब्बी लोकही त्यांचे चाहते होते. महाजनाची कार्यप्रणाली त्यांनी समजावून घेतली होती. नियामक मंडळात आलेल्या अनियमित प्रकरणात ते खूप गुंतवून घेत नव्हते. जिथे कुठे मंत्र्यांचा इंन्टरेस असायचा त्या त्या ठिकाणी ते पहल करत नसे किंवा दोन पावले मागे जात असे. नवीन माणूस आल्यावर त्याला अशाप्रकारे ऍडजेस्ट व्हायला वेळ लागणारच. जुन्याना जे जमले ते येणाऱ्या प्रत्येकालाच जमेल असे नाही. त्यातल्या त्यात प्रवीण परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालय सांभाळले होते. सत्तेची किल्ली त्यांचेकडे होती. कदाचित आज भाजपा सरकार असते तर राज्याचे मुख्य सचिव म्हणून प्रवीण परदेशी विराजमान झालेले दिसले असते, पण त्यांना तेथे न बसविता नगर विकास व जलसंपदात बसविले. आज संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनियुक्तीवर प्रवीण परदेशी जात आहे. अनेक ठिकाणी अनेक चांगली कामे त्यांनी केलेली आहे. अगोदर सुद्धा संयुक्त राष्ट्रात नैसर्गिक आपत्ती नंतरचे पुनर्वसन या महत्त्वाच्या क्षेत्रात सात वर्ष त्यांनी काम केलेले आहे. त्यांना मनासारखे काम मिळाल्याने ते त्वरीत कार्यमुक्त झाले. त्यांच्या पुढील कार्यासाठी पाणीदार शुभेच्छा आम्ही देत आहोत. त्यांचे जागी भूषण गगराणी यांची नगर विकास विभागाचे सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. जलसंपदा चा अतिरिक्त कारभार भूषण गगराणी यांच्याकडे जाईल असे वाटते. शेवटी परत जलसंपदाला पूर्ण वेळेचा प्रधान सचिव मिळेनासा झाला आहे. शेवटी एवढेच म्हणता येईल की फूल टाईम कोणी प्रधानसचिव देता का हो, कोणी प्रधान सचिव देता.

प्रवीण महाजन,
जल अभ्यासक,
नागपूर, विदर्भ.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...