Home परभणी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती कडुन पाथरी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन सोहळा...

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती कडुन पाथरी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन सोहळा संपन्न…!

157

परभणी – जिल्हातील पाथरी पोलीस स्टेशन येथे पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या वतीने , डॉ. संघपाल उमरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष , मा.विनोद पत्रे , महाराष्ट्र सचिव , अहमद अन्सारी, मराठवाडा अध्यक्ष शेख अजहर हादगावकर , ईफत्तेखार बेलदार, मराठवाडा सचिव,भरत घांडगे,परभणी जिल्हा उपाध्यक्ष,शेख समिर जिल्हा सचिव यांच्या नेतृत्वाखाली रक्षाबंधन, राखी पोर्णिमा सोहळा साजरा करण्यात आला. पोलीस निरीक्षक श्री मा. टिप्पलवाड यांना व पोलीस स्टेशन मधिल सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना परभणी व पाथरी येथील पो.मि.प.स.समिती महिला पदधिकारी यांनी राखी बांधून बहिण भावाच्या प्रेमाची व नात्याची जाणीव करून दिली.

कोरोना महामारी संचार बंदीमध्ये लाँकडाऊन असल्याने पोलीस कर्मच्याऱ्यांना बहिणीकडे जाता येत नाही आणी रक्षाबंधन व ईतर सण उत्सवास सुध्दा हजर राहता येत नाही.

पोलीस विभागातही कर्मचाऱ्यांना कुंटुब सभासद समजुन पोलीस मित्र परीवार समन्यवय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा. रेखाताई मनेरे यांनी पुढाकार घेऊन पोलीस कर्मचारी वर्ग या सर्वांना महिलांनी राखी बांधून व सोशेल डिस्टेनसपाळून राखी बांधण्यात आली.या सोहळ्यास पोलीस निरीक्षक मा.बालाजी तपलवाड, दामिनी पथक प्रमुख मा.राजश्री बहिरे मॅडम , मा. मनिषा राठोड , महिला पोलीस , मा.शेख सिकंदर , समाजसेवक मा. महेश जोशी रक्षाबंधन सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा महिला अध्यक्ष मा.रेखा मनेरे यांच्या नेतृत्वात सौ.उषा भाग्यवंत तालुका अध्यक्ष , सौ.मुक्ताबाई डोंगरे तालुका कार्य अध्यक्ष, सौ. सुशिलाबाई मनेरे, सौ.सुमनबाई साळवे, सौ.शिला गायकवाड,यांनी व सर्व परभणी जिल्हा व पाथरी महिला पदधिकारी, सभासद,यांनी रक्षाबंधन सोहळ्यास सहकार्य व मदत केली.