
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा – सिंदी रेल्वे पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालताना मौजा आमगाव फाटा येथे पल्सर गाडीने वर्धेकडे जात असलेल्या दोन युवकांना बेकायदेशीर गांज्याची वाहतूक करतांना मुद्देमाला सह अटक करून N D P C कायदयान्यवे कलम २० व २९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, सिंदी पोलिस मंगळवारच्या रात्रीला गस्त घालत असतांना नागपूर वर्धा रोडवरती आमगाव फाट्यावर पल्सर गाडी क्र MH 32 AP 4389 वर स्वार चेतन अंबादास मडावी रा पिपरी मेघे वर्धा व नयन दत्तूजी कडू रा. कारला रोड वर्धा हे वर्धेच्या दिशेने ६ किलो ६०० ग्राम गांजा किंमत ६६००० हजार व पल्सर गाडी ५०००० रुपये असे एकूण ११६००० रुपये असा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुने, पोलीस हवालदार जावेद धामिया, पोलीस शिपाई अमोल पिंपळकर, हेमंत नरड, सतीश हांडे यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत काळे करीत आहे.










































