Home जळगाव अमन एज्युकेशन सोसायटी’च्या 101 बॅग रक्त संकलन

अमन एज्युकेशन सोसायटी’च्या 101 बॅग रक्त संकलन

139

रक्तदान करून , रक्त कुर्बानी…!

रावेर (शरीफ शेख)

ईद उल अजहा (बकरी ईद) प्रसंगी यावर्षी कुर्बानी चे महत्त्व लक्षात घेता. रक्त कुर्बानी
अर्थात रक्तदान करून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. अमन एज्युकेशन सोसायटी व रेड प्लस रक्तपेढी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी कुर्बानी चा अर्थ व ईद उल अजहा या दिवशी कुर्बानी का करतात त्याचे महत्त्व समजून दिले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख महापौर सौ भारती सोनवणे , हाजी गफ्फार मलिक, अब्दुल करीम सालार, प्रतिभा शिंदे ,ॲडव्होकेट अखिल इस्माईल, शनी पेठ पोलीस स्टेशन पीआय विठ्ठल ससे , सचिन धांडे, जमील देशपांडे, अजीज सालार, जमील शेख, रईस बागवान , फारुख कादरी ,सैय्यद सादिक , शब्बीर गुलशेर, नईम बशीर ,अन्वर शिकलकर, दानिश पठाण , जननायक चे फरीद खान, आसिफ शाह बापू, अजीज़ बाबा, जिया शेख, यासर अराफात, युसुफ़ खटिक आदि,उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी यांचे सहकार्य लाभले अमन एज्युकेशन सोसायटी चे शाहिद सय्यद ,युवा विंग अध्यक्ष साहिल(फरदीन) सय्यद , उपाध्यक्ष शैख शफीक , अहमद शेख सय्यद हसन, समीर शेख, मंजिल अहमद, खान अरबाज ,खान साहिल, खान इम्रान आली तन्वीर मन्यार, शोएब कुरेशी ,आमिर खान ,शोएब खान, बल्ली , यांनी परिश्रम घेतले. एकूण 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शेवटी अल्ताफ मणियार शाहिद खान निसार खान सय्यद साजिद अली सय्यद वाजिद अली यांनी आभार मानले.