Home मराठवाडा योगीराज कैलासनाथ महाराज संत प्रकोष्ठ मराठवाडा प्रचार मंत्री

योगीराज कैलासनाथ महाराज संत प्रकोष्ठ मराठवाडा प्रचार मंत्री

612

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील संजीवन समाधी ध्यान योग केंद्राचे संचालक योगीराज कैलासनाथ महाराज यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या संत प्रकोष्ठ मराठवाडा प्रचार मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

योगीराज कैलासनाथ महाराज संत प्रकोष्ठ मराठवाडा प्रचार मंत्री या परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री डॉ दिगंबर श्रीकृष्ण पुरीजी महाराज तसेच राष्ट्रीय महासचिव डॉ पद्मनाभ गिरीजी महाराज यांनी कैलासनाथ महाराज यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे वारकरी संप्रदाय तसेच विविध धार्मिक संस्थानच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.