Home मराठवाडा कुंभार पिंपळगाव येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बाजारपेठ बंद

कुंभार पिंपळगाव येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बाजारपेठ बंद

39
0

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगीजालना – जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे महिनाभरापूर्वी एका डॉक्टरांचा कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर काल मंगळवारी आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

येथील बाजार पेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीचे गांभीर्य वाढल्याने आज बुधवारी आठवडी बाजार बंद असल्याने बाहेर गावचे भाजी विक्रेते,भुसारी, व्यापारी परतले आहेत. कोरोना महामारीचे संकट गडद होत चालल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सूचनांचे पालन करावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, ताजे अन्नपदार्थ खावे, गरम पाणी प्यावे, कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात, योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Unlimited Reseller Hosting