Home विदर्भ शिवराया विद्यार्थी संघटनेच्या वतीने तलाठी सुबोध धोंगडी यांचा पटवारी दिनाचे औचित्य साधून...

शिवराया विद्यार्थी संघटनेच्या वतीने तलाठी सुबोध धोंगडी यांचा पटवारी दिनाचे औचित्य साधून जन्मदिनी कोविड योद्धा म्हणून सत्कार

230

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील हिगणघाट तालुक्यातील अल्लीपुर गावाचे तलाठी यांचा शिवराया विद्यार्थी संघटनेच्या वतीने पटवारी दिनाचे औचित्य साधून कोविड योद्धा म्हणून शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सविस्तर वृत्त असे की मागील ५ वर्षापासून हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या गावात तलाठी धोंगडी हे सतत सेवा देत आहे,या गावात लोकसंख्या लक्षात घेता दोन तलाठ्याची आवश्यकता असून सुद्धा तलाठी धोंगडी एकटे च आपले कार्य उत्कृष्टपणे बजावत आहे. यांचं मुक्कामी गाव नागपूर असून मागील पाच महिन्यापासून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रालाच परिवार समजत अल्लीपुर येथील तलाठी कार्यालयात मुक्काम ठोकून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे याचं उद्देशाने एक आगस्ट रोजी झालेल्या पटवारी दिनाचे औचित्य साधून आज त्यांच्या जन्मदिनी शाल,श्रीफळ देत सत्कार करत त्यांना अश्याच अविरत सेवा करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे यावेळी शिवराया विद्यार्थी संघटनेचे मार्गदर्शक कैलास घोडे, संस्थापक,अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन सेलकर,उपाध्यक्ष विकास गोठे,सचिव मयूर डफ,निशांत लांभाडे,श्रुनय ढगे, रोशन नरड,हृषीकेश कोमुजवार,आकाश घुसे,दिनेश गुळघाणे,प्रज्वल डफ,खुशाल दौलतकर व कार्यकर्ते उपस्थित होते.