Home उत्तर महाराष्ट्र राम लिलेची रंगभूषेचा पिढीजात वारसा जपतोय – रंगभूषाकार नाना जाधव

राम लिलेची रंगभूषेचा पिढीजात वारसा जपतोय – रंगभूषाकार नाना जाधव

142

अयोध्या राममंदिर निर्माण विशेष

नाशिक :- गेल्या ५० वर्षे आमच्या कुटुंबाने गांधीनगर येथील रामलिलेच्या पात्रांची रंगभूषा अविरतपणे सुरू ठेवली आहे.

माझे दिवंगतवडील बाळासाहेब जाधव (रा.नाशिक) जुनेजाणते रंगभूषाकार त्यांच्या संस्काराने मी ही रंगभूषेची कला शिकलो,गांधींनगरच्या रामलिलेच्या सर्वच पात्रांची रंगभूषा वडिलांनी ३५ वर्षे केली तोच वारसा रंगभूषाकार रविंद्र ऊर्फ नाना जाधव यांनी अविरतपणे सुरू ठेवली आहे.आयोध्याला राममंदिराचे निर्माण मोठ्या उत्साहात होत असताना आमचा परिवार व मी अतिशय आनंदीत झालो आहे.आमच्या रामलिलेच्या अविरत रंगभूषेच चीज झालं असं रंगभूषाकार रविंद्र जाधव यांनी सांगितले.
नाशिक ही प्रभू रामचंद्रांची वनवास भूमी,गोदावरी नदी व पंचवटीत प्रभू रामचंद्र,सीतामाई ,लक्ष्मनाचे वास्तव्य त्याकाळी होते.गांधीनगरच्या १५० वर्षे रामलीला सारख्या जुन्या सांस्कृतिक अध्यात्मिक परंपरेचा रंगभूषेचा वारसा जपणारे जाधव घराणे ही गोदाकाठी रामवाडी भागातले आहेत.हाच वारसा जोपासणारे रविंद्र जाधव ज्यांना नाशिककर नाना म्हणून ओळखतात ते नाना आजही वडिलांनी दिलेला वारसा आजही जोपासताहेत,बोहडा,वीरांच्या मिरवणुका , कुंभमेळ्यातील धार्मिक नाटिका,नाट्य,चित्रपट अश्या क्षेत्रातील पात्रांची रंगभूषा करतात,या कलेच्या मार्गात गांधीनगर रामलिलेची रंगभूषेच्या पिढीजात रंगभूषेच्या निमित्ताने आम्ही कृतार्थ झालो आहोत,प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत प्रभू रामाचे भव्य मंदिर निर्माणाचा शुभारंभ होत असल्याने आम्ही केलेल्या सेवेच फळच मिळाले आहे.