नांदेड

किनवटमध्ये आज 5 बाधितांची भर, आता 25 रुग्ण घेताहेत उपचार ; 11 वर्षाचा मुलगा व 13 वर्षाची मुलगी निघाली पॉझिटिव्ह

Advertisements
Advertisements

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. ०३:- किनवटमध्ये आज सोमवारी ( ता. तिन) सायंकाळी पावने सहा वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर पद्धतीद्वारे केलेल्या तपासणीत 5 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधित रूग्णांची एकूण संख्या वाढून आता 32 झाली आहे. कोरोनामुक्त बरे झाल्याने सुटी होऊन घरी गेलेले आजपर्यंतचे एकूण 7 जण आहेत. बाधितांपैकी संदर्भित 3 व येथील कोविड केअर सेंटरमध्ये 22 असे एकूण 25 रुग्ण उपचार घेत आहेत.
सोमवारी (दि. तीन ) सायं.05.45 वा . वाजता किनवटच्या एस.व्ही.एम. येथील 34 वर्षे वयाची एक महिला 13 वर्षाची एक मुलगी,11 वर्षाचा एक मुलगा, मोमीनपुरा येथील 44 वर्षाचा एक पुरुष व शिवणी येथील 21 वर्षाची एक महिला अशा 5 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. नविन रुग्ण आढळल्यामुळे उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी शिवणी गाव आता कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.
किनवट शहरातील एस. व्ही. एम. कॉलनी, मोमीनपूरा, इस्लामपूरा, राजेंद्रनगर व तालुक्यातील तल्लारी, राजगड तांडा, लोणी व आता शिवणी या कंटेनमेंट झोनच्या विविध कामांची जबाबदारी तहसिलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांचेवर सोपविली आहे.
डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 15 ( आरटीपीसीआर 9 + रॅपिड 6 ), कोविड केअर सेंटर, किनवट येथे 7 ( आरटीपीसीआर 4 + रॅपिड 3 ), व पूर्वीच संदर्भित 3 अशा एकूण 25 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 03/08/2020 सायंकाळी 17.45 वा. वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
घेतलेले एकूण स्वॅब-209,
निगेटिव्ह स्वॅब- 159,
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह संख्या- 5
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 10
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,

ऍन्टिजेन टेस्ट
अॅन्टिजन टेस्ट – 01
निगेटिव्ह अहवाल – 01
आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल – 0

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण – 5
मृत्यू संख्या- निरंक,
आतापर्यंतचे एकुण पॉझिटिव्ह व्यक्ती- 32,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली एकूण संख्या- 7,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 22 + संदर्भित रुग्ण 3

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

तळेगांव आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी, प्रशासनाच्या आदेशाला झुगारून जबरदस्तीने भरविला बाजार

पोलिसांनी पार पाडली फक्त बघ्याची भूमिका तर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गर्दी जमवत भरला बाजार   ...
नांदेड

लोहा उपजिल्हा रुग्णालयास वसुधरारंत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव धावे.

पञकार संरक्षण समीती नांदेड दक्षिण विभाग यांची मागणी  नांदेड :- लोहा उपजिल्हा रुग्णालयास वसुधरारंत्न राष्ट्रसंत ...