विदर्भ

एकाचा जागीच मृत्यू तर एक जखमी.!

Advertisements
Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

जखमीला वर्धा येथे केले दाखल…!

वर्धा – जिल्ह्यातील विरुळ पुलगावआर्वी रोडवर धनोडी फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. गणेश बेलखडे वय ५५ व शरद चाफले वय ५२ हे दोघेही आर्वी येथे दुचाकी क्रमांक MH-२९ AG- 617 ने जात होते. दरम्यान पुलगावकडून भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 31-CB -5551 ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गणेश बेलखडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शरद चाफले गंभीर जखमी झाले. त्यांना वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे. ट्रकसह चालकाला आर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी आर्वी पोलिस स्टेशनचे निरीक्षक संपत चव्हाण व कर्मचारी हजर होते. पुढील तपास आर्वी पोलिस करीत आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

★’दमदार विद्यार्थी वक्ता महाराष्ट्राचा’ राज्यस्तरीय ओनलाईन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद……

कोण ठरणार वक्ता महाराष्ट्राचा? बालवाक्पटुसह सर्वांची उत्कंठा शिगेला….. यवतमाळ / घाटंजी , दि.२६ :-  यवतमाळ ...
विदर्भ

घरफोडी , चोरी करणारी टोळी गजाआड , “२४ गुन्हे उघडकीस” , ५ लाख २१ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त….!

रवि माळवी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई यवतमाळ , दि. २६ :- चोरट्यांनी चोरी केलेले ...
विदर्भ

बेशिस्तांवर कारवाईचा बडगा , “जिल्हाधिका-यांकडून इर्विन चौकात बेशिस्तांवर कारवाई”

मनीष गुडधे    अमरावती – कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाललेली असतानाही मास्कचा वापर न करता बेपर्वाईने ...
विदर्भ

” सितादही ” पुर्वीच पांढर्या सोन्याला काळा डाग , “आभाळ फाटले”

आयुष्याचा ७\१२कोरा…! कर्जाची चिंता….! भूमिपुत्र हतबल…! मदतीची गरज…! देवानंद जाधव यवतमाळ – सध्या आभाळाच्या सारीपाटावर पावसाचा ...