Home महत्वाची बातमी संजय दत्त पुन्हा जाऊ शकतो पुन्हा तुरुंगात ???

संजय दत्त पुन्हा जाऊ शकतो पुन्हा तुरुंगात ???

30
0

याचिका दाखल ,

अमीन शाह

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेला अभिनेता संजय दत्त याच्या अडचणी पुन्हा वाढण्याची चिन्हं आहेत. संजय दत्त याच्या सुटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. शिक्षा पूर्ण होण्याआधीच त्याला तुरुंगातून सोडण्यात आल्याचा आरोप एका याचिकेद्वारे करण्यात आला आहे.  
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी ए. जी. पेरारीवलन उर्फ अरीवू यानं मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातील याचिका केली आहे. पेरारीवलन हा सध्या चेन्नईतील तुरुंगात आहे. संजय दत्तप्रमाणेच त्यालाही बेकायदा शस्त्रास्त्रविरोधी कायद्यांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. नऊ व्होल्टच्या दोन बॅटरी उपलब्ध करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या बॅटरींचा वापर राजीव गांधी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये करण्यात आला होता. याच प्रकरणात पेरारीवलन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागील २९ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या पेरारीवलन यानं तुरुंग प्रशासनाकडून संजय दत्तच्या शिक्षेतील कपातीबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती त्याला मिळू शकली नाही. त्यामुळं त्यानं न्यायालयात धाव घेतली आहे. अॅड. नीलेश उके यांच्यामार्फत त्यानं न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
वेळेआधी सुटला होता संजय दत्त
संजय दत्त याला २००६-०७ साली विशेष न्यायालयानं शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवून सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना ही शिक्षा एका वर्षाने कमी केली होती. त्यानंतर मार्च २०१३ साली संजय दत्त तुरुंगात गेला. शिक्षा भोगत असताना त्यांना अनेकदा पॅरोलवर सुट्टी देण्यात आली होती. शिवाय, २५ फेब्रुवारी २०१६ रोजी २५६ दिवस आधी त्याची तुरुंगातून सुटकाही करण्यात आली.

Unlimited Reseller Hosting