Home जळगाव कोरोना योद्धांचा सन्मान करतांना रा.यु.कांग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष मा.दिपक भाऊ पाटील

कोरोना योद्धांचा सन्मान करतांना रा.यु.कांग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष मा.दिपक भाऊ पाटील

31
0

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील खिर्डी बु. येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा नकरता काम करणाऱ्या कोरोना योद्धांनां प्रोहत्सान देण्यासाठी जळगांव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र नाना पाटील यांच्या संकल्पनेतून प्रशस्तीपत्र व पुष्पगुष देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाकार्यध्यक्ष दिपक पाटील यांच्या हस्ते कोरोना समितीमधील आरोग्यसेवक,सरपंच, पोलीसपाटील,तलाठी,ग्रामसेवक, आशावर्कर,आंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार,स्वयंसेवी संस्था,सफाई कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फेगडे,राजेंद्र महाजन,खिर्डी बु. सरपंच गफूर कोळी,पं.स.माजी उपसभापती घनःश्याम पाटील,युवक तालुका उपाध्यक्ष चावदस पाटील,वाघाडी येथील ललित पाटील,खिर्डी बु.ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील,पंकज राणे,ग्रामसेवक व्ही.जे.महाजन,अस्लममिस्त्री, कलीम शेख,राष्ट्रवादी युवकचे तालुका सरचिटणीस गणेशभाऊ,निखिल महाजन,गणेश देवगिरकर,तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रजीत पाटील,माजी पोलीस पाटील अरुण पाटील,उमेश तायडे,मयूर इंगळे,दिगंबर कोळी,भूषण कोळी, इद्रीस शेख,आदी उपस्थित होते.यावेळी श्री प्रवीण धुंदले सर यांनी सूत्रसंचालन केले.

Unlimited Reseller Hosting