Home नांदेड कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी बँक खातेदारांनी पोस्ट बॅंकेचा घरपोच लाभ घ्यावा – सुरेश...

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी बँक खातेदारांनी पोस्ट बॅंकेचा घरपोच लाभ घ्यावा – सुरेश सिंगेवार एम. ई

25
0

नांदेड , दि. 29 :- जिल्यातील कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या संख्येने दररोजच्या दररोज वाढ होत आहे. हे रोखण्यासाठी नागरिकांनी घरपोच पोस्ट बॅंकेचा लाभ घ्यावा.
असे अहवान नांदेड मुख्य पोस्ट ऑफिसचे विपणन कार्यकारी अधिकारी सुरेश सिंगेवार यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील बँकेत सरकारी अनुदान किसान सन्मान योजना, जनधन योजना, निराधार अनुदान जमा झालेले काडण्यासाठी नागरिकांनी बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
हे अनुदान नागरिकांनी घरपोच पोस्ट बँकेतून घेतल्यास कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी मोठी मदत होईल.
कारण पोस्ट बँक ही केंद्र सरकार ची बँक आहे.
या बँकेचे सर्व व्यवहार डिजिटल असून कोणत्याही बँक खात्यातील पैसे काडण्या करिता ग्रामीण भागात व वाड्या तांड्यात व शहरातील पोस्टमनकडे मायक्रो ATM पोस्ट बँकेने दिलेले आहे.
नागरिकांनी ईतर कोणत्याही बँकेत व खाजगी सेवा केंद्रातून पैसे काडण्यासाठी व भरण्यासाठी न जाता घरपोच आपण पोस्ट बॅंकेचा लाभ घ्यावा.
पोस्ट बँकेत नागरिकांना ही सुविधा घेण्यासाठी पोस्ट बँकेत खाते नसले तरी यांचा लाभ आपण घेऊ शकता बँकेतील पैसे उचलण्यासाठी भरण्यासाठी व पाठवण्या करिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
असे सुरेश सिंगेवार यांनी सांगितले.
ही सुविधा नांदेड जिल्ह्यात चारशे अंशी पोस्ट ऑफिस ब्रँच पोस्ट मास्तर व पोस्टमन मार्फत घरपोच ही सेवा घेता येतो.
पोस्ट बँकेची सेवा प्रत्येक नागरिकांनी घरपोच व गावात घेतल्यास शहरातील गर्दी कमी होईल व कोरोना पादुर्भाव रोखण्यासाठी मोठी मदत होईल असे ही सिंगेवार यांनी सांगितले.
पोस्ट बँक सुविधाचा लाभ घेताना सोशल डिस्टस्टिंग व मास्क वापर आणि प्रत्येक व्यवहार झाल्याने सैनिटायझर चा वापर करण्यात येत आहे.

Unlimited Reseller Hosting