Home जळगाव युवक काँग्रेस रावेर विधानसभा तर्फे अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्यात बाबत राष्ट्रपतीना...

युवक काँग्रेस रावेर विधानसभा तर्फे अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्यात बाबत राष्ट्रपतीना निवेदन

186

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील फैज़पुर युवक काँग्रेसच्या वतीने फैज़पुर प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदय यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातले असताना परिस्थिती अत्यंत बिकट आहे तर या स्थितीत अंतिम वर्षाच्या सर्व परिक्षा रद्द करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रपती महोदय यानां निवेदन द्वारे करण्यात आले.

यावेळी युवक काँग्रेसचे रावेर विधानसभा अध्यक्ष शेख वसीम जनाब व विधानसभा कार्याध्यक्ष मुदस्सर नजर ,वसीम तडवी शेख मोहसीन, शेख रियाज, इमरान पटेल, सै जफर,मुस्लिम शेख सह रावेर विधानसभेतील युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.