Home जळगाव पाचोरा येथे सु.भा.पाटील प्राथमीक शाळेत एकदिवसीय विशेष कोरोना आरोग्‍य चाचणी शिबीर संपन्‍न

पाचोरा येथे सु.भा.पाटील प्राथमीक शाळेत एकदिवसीय विशेष कोरोना आरोग्‍य चाचणी शिबीर संपन्‍न

122

निखिल मोर

पाचोरा – जळगांव जिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता म.जिल्‍हाधिकारी सो. जळगांव यांच्‍या आदेशानूसार पाचोरा शहरातील नागरीकांच्‍या आरोग्‍य तपासणी कामी विविध प्रभागात एकदिवसीय विशेष कोरोना चाचणी शिबीर आयोजीत केलेले असून दिनांक 28 जुलै रोजी शहरातील प्रभाग क्रं. 6 च्‍या परिसरातील नागरीकांसाठी देशमुखवाडी भागातील सु.भा.पाटील प्राथमीक विद्या मंदिर येथे तपासणी शिबीर आयोजीत केले होते. शिबीर सुरु झालेनंतर परिसरातील नागरीकांकडून अत्‍यल्‍प म्‍हणजे 5 ते 10 नागरीकांनी तपासणी करीता उपस्थित होते.

कोरोना तपासणी बाबत नागरीकांमध्‍ये उदासिनता / भिती असल्‍याचे लक्षात येताच मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी स्‍वतः प्रभागात फिरुन कोरोना टेस्‍ट बाबतची नागरीकांच्‍या मनात असलेली भिती / उदासिनता दुर करताच सदर भागातील महिला, पुरुष, वृध्‍द नागरीक तसेच बालके यांनी तपासणीकरीता सहमती दर्शवीली या वेळी मुख्‍याधिकारी यांच्‍या बोलतांना गौंड वस्‍ती भागातील काही नागरीक म्‍हणाले की, आम्‍हाला ही तपासणी करण्‍याची खुप भिती मनात होती परंतू आपण आमच्‍याच सोप्‍या भाषेत समाजावून सांगीतल्‍याने आता आमच्‍या मनातील भिंती नाहीशी झाल्‍याने आम्‍ही स्‍वखुशीने तपासणी करण्‍यास तयार आहोत. आज पावेतो सिंधी कॉलनी येथे 85 तपासण्‍या, बस स्‍थानक येथे 37 तपासण्‍या व सु.भा पाटील प्रा.वि.मंदीर येथील शिबीरात तब्‍बल 249 तपासण्‍या पुर्ण करण्‍यात आल्‍या. शासनाकडून मोफत तपासणी शिबीरात तपासणी करण्‍यात येत असल्‍याने नागरीकांकडून समाधान व्‍यक्‍त केले जात आहे.
यावेळी तालुका वेधकीय अधिकारी अमित साळुंखे, नगरपालिकेच्‍या मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, सुधीर पाटील, ललित सोनार, पांडुरंग धनगर, विजय बाविस्‍कर, विशाल दिक्षीत, भागवत पाटील, अनील वाघ, आकाश खैरनार, विलास कुलकर्णी, युवराज जगताप, शरद नागणे, हीम्‍मत महाजन, सुभाष बागुल, दिपक बनसोडे, देवीदास देहडे, वाल्मिक गायकवाड, राकेश फतरोड, शरीफ खान तसेच आरोग्‍य विभागाकडून वनिता कैलास जाधव, भारती अशोकराव सोळुके, दिपाली प्रकाश भावसार, भिलाबाई शामराव ढोले, भुषण पाटील आदी उपस्थित होते.
पुढील तपासणी दिनांक 29/07/2020 रोजी एम.एम.कॉलेज,भडगाव रोड पाचोरा येथे असणार असल्‍याने नागरीकांनी येतांना आपले आधारकार्ड सोबत आणाचे असे मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी आवाहन केले आहे.