Home नांदेड रेती चोरट्यावर आळा घाला म्हणून,तहसिल कार्यालसमोर लाक्षणिक उपोषणास बसण्याचे ईशारा – गंगाधर...

रेती चोरट्यावर आळा घाला म्हणून,तहसिल कार्यालसमोर लाक्षणिक उपोषणास बसण्याचे ईशारा – गंगाधर प्रचंड

23
0

बिलोली ता.प्र.सुनिल जेठे

तालुक्यातील येसगी , बोळेगाव , सगरोळी येथील मांजरा नदीपाञातुन मध्यरात्री रेती
चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला प्रकार पाहुन मांजरा बचाव कृती समिती चे अध्यक्ष गंगाधर प्रचंड यांनी रेती चोरट्यांंनी रेतीची मोठी तस्करी करीत तरी या रेती चोरट्यांंवर शासकीय नियमानुसार कार्यवाही करुन वरील प्रकाराला आला घालावे म्हणून बिलोली तहसिदार विक्रम राजपूत यांना लाक्षणिक उपोषणास बसण्याचे ईशारा गंगाधर प्रचंड यांच्या निवेदनाद्वारे देण्यात आले.
सदर बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपाञातुन रेती उपसा करण्यासाठी महसुल प्रशासनाने रेती लिलाव प्रक्रियेतुन परवानगी देण्यात येत नसल्यामुळे तालुक्यात घरकुल,स्वच्छालय,ग्राम पं. नाल्या,रस्ते,विविध बांधकामे डखडले असताना त्या बाधकाम रेती मिळत नाही.
कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झालेल्या काळात प्रशासन विविध उपाययोजनात व्यस्थ असताना रेती चोरट्यांनी
सर्रास रेती उतखनन करुन विणा राॕयल्टी वाहनाद्वारे तस्करी होतांना रेती माफीया शिरजोर होत आहेत,
यामुळे शासनाचा महसुल बुडवीत आहेत तर दुसरीकडे पर्यावरणाचे मोठे नुकसान करीत शासनाच्या डोळ्यांत धुळ फेकण्याचा प्रकार ह्या रेती चोरट्यांनी कडून केला जात आहे. यासाठी कांही प्रशासकीय व्यक्ती माफियांना सहकार्य केल्यामुळे रेतीचे उत्खनन होत असलेले प्रकार बंद करावे.
केवळ घरकुल,स्वच्छालय बांधकामासाठी शासकीय नियमानुसार राँयल्टी भरुन घेऊन
रेती उपलब्ध करुन द्यावी अन्यथा दि.४आँगस्ट २०२० रोजी ११ः३० वा तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक करण्यात येईल असे इशारा मांजरा बचाव कृती समिती चे अध्यक्ष गंगाधर प्रचंड यांच्या सह सचिव अभिजीत महाजन , सहसचिव चंद्रकांत लोखंडे, उपाध्यक्ष व्यंकट सिंदनोड, उपाध्यक्ष हाणमंत मिनके यांनी निवेदनावर स्वाक्षरी केले आहेत.

Unlimited Reseller Hosting